गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:28 PM2019-05-20T21:28:06+5:302019-05-20T21:29:42+5:30

सहा पादचाऱ्यांचा समावेश 

27 deaths in road accidents in Goa in one month | गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्दे१ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले.

पणजी - एप्रिल महिन्यात राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये २७ बळी गेले. यात सहा पादचारी तसेच एका सायकलस्वाराचा समावेश आहे. १ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. 

वाहतूक खात्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महिनाभरात २८४ अपघातांची नोंद झाली. यातील २४ अपघातांमध्ये बळी गेले. उत्तर गोव्यात ६ आणि दक्षिण गोव्यात १८ असे अपघात घडले. १७ अपघातांमध्ये गंभीर इजा झाल्या. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ११ असे अपघात घडले. ७१ अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. १७३ अपघातांमध्ये कोणालाही इजा झाली नाही. २७ बळींमध्ये उत्तर गोव्यातील अपघातांमध्ये ६ तर दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. यात ११ वाहनचालक, ६ पादचारी, ७ प्रवासी, १ सायकलस्वार व इतरांचा समावेश आहे. १६ जणांना गंभीर इजार झाल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले. उल्लंघनांविरुध्द पोलिसांनी आरंभलेल्या खास मोहिमेत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

- वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर केल्या प्रकरणी २७६ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

- निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन हाकल्या प्रकरणी ५४४ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले.

- मद्यपान करुन वाहन चालविल्या प्रकरणी ५१९ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले. 

- काळ्या काचांचे वाहन वापरल्या प्रकरणी ४५२४ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

Web Title: 27 deaths in road accidents in Goa in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.