मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, ६७ वर्षीय वृद्धाला ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:02 PM2019-05-20T21:02:55+5:302019-05-20T21:03:58+5:30

 नजमुल हसन नाजमी उर्फ नाजमी (६७) असं या आरोपीचं नाव आहे.

26 women trafficked from Saudi Arabia, Saudi Arabia bribe | मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, ६७ वर्षीय वृद्धाला ठोकल्या बेड्या 

मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, ६७ वर्षीय वृद्धाला ठोकल्या बेड्या 

Next
ठळक मुद्दे२६ मुलींची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाजमी हा सध्या कुर्लाच्या एलबीएस रोडवर नूर मंजिलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. 

मुंबई - परवाना रद्द झालेल्या कंपनीच्या बनावट कागदपत्रांच्या मदतीने सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नजमुल हसन नाजमी उर्फ नाजमी (६७) असं या वृद्ध आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

वांद्रे येथील भारत नगर परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने एप्रिल २०१५ मध्ये माझगावच्या “ट्रायोटेक  कन्सल्टन्ट” कंपनीद्वारे कामासाठी टूरिस्ट व्हिजावर सौदी अरेबियाला पाठवले होते. मात्र, सौदीत तरुणीला ज्या कामाचे स्वरुप सांगून नेण्यात आले होते ते काम न देता तिला गैरकृत्य करण्यास भाग पाडले. याबाबतची माहिती तरुणीने तिच्या आईला दिली. तिच्या आईने याबाबत नवी दिल्लीच्या इमिग्रेशन संरक्षण विभागात तक्रार नोंदवल्यानंतर ६ मे २०१६ रोजी नाजमीने तरुणीला भारतात आणले. या घटनेनंतर नाजमीने “ट्रायोटेक कन्सल्टन्ट” या कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रवाशांची माहिती इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी गोळा करण्यास सुरूवात केली. या कंपनीच्या परवानाधारक मालकाचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून कंपनीचा परवाना तात्पुरता निलंबित केल्याचं तपासात उघडकीस आलं.

तपासात नाजमीने “ट्रायोटेक  कन्सल्टन्ट”द्वारे आतापर्यंत २६ तरुणींना बेकायदेशीर मार्गाने सौदी अरेबियाला पाठवल्याचं निष्पन्न झालं. या “ट्रायोटेक कन्सल्टन्ट” कंपनीचे कार्यालय माझगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी नाजमीचा शोध सुरू केला. नाजमी हा कुर्ला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस  इमरान अपार्टमेंटमधील घरी गेले. मात्र नाजमीने घर भाड्याने दिलं होतं. तसेच त्याने भाडेकरूला त्याचा सध्याचा रहात असलेला पत्ताही दिला नव्हता. खबऱ्यांच्या सहाय्याने नाजमी हा सध्या कुर्लाच्या एलबीएस रोडवर नूर मंजिलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. 



 

Web Title: 26 women trafficked from Saudi Arabia, Saudi Arabia bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.