Yuvraj wishes for this former captain | युवराजला कमबॅकसाठी या माजी कर्णधाराचा शुभेच्छा

ठळक मुद्देकाही दिवसांनंतर आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावेळी युवी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास या कर्णधाराने व्यक्त केला.

नवी दिल्ली : युवराज सिंग या भारताच्या गुणी अष्टपैलू खेळाडूला कुणीही विसरू शकत नाही. कर्करोगाला पराभूत करत साऱ्यांचा लाडका युवी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतला होता. पण काही दिवसांपूर्वी तो एका चाचणीमध्ये तंदुरुस्त नसल्याने निष्पन्न झाल्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. पण युवीने पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहेच, पण भारताच्या एका माजी कर्णधाराने त्याला पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी युवराज आणि भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांची भेट झाली होती. काही दिवसांनंतर आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावेळी युवी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अझरने व्यक्त केला आहे.

युवराज आणि माझी काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. युवीचा खेळ अजूनही फार चांगला आहे. त्यामुळे तो भारतीय संघात कमबॅक करू शकतो, असा मला विश्वास आहे. संघात कमबॅक करण्यासाठी युवी माझ्याकडून शुभेच्छा, असे मत अझर यांनी व्यक्त केले आहे.


Web Title: Yuvraj wishes for this former captain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.