युवराज सिंगचा 'switch hit' षटकार, पाहा व्हिडीओ...

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:41 AM2019-02-19T09:41:52+5:302019-02-19T09:42:19+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh smashes a six with a brilliant switch hit - Watch video | युवराज सिंगचा 'switch hit' षटकार, पाहा व्हिडीओ...

युवराज सिंगचा 'switch hit' षटकार, पाहा व्हिडीओ...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. 2019च्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यामुळे आयपीएलमध्ये युवराजची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. युवराजनेही आयपीएलमध्ये धडाकेबाज पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 स्पर्धेत युवराजची बॅट चांगलीच तळपली होती आणि आता त्याच्या फटकेबाजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याने मारलेला switch hit पाहून भल्याभल्यांची बोलती बंद होईल... 

एका मैत्रीपूर्ण सामन्यात एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने मालदिव क्रिकेट संघाविरुद्ध हा switch hit मारला. त्याचा हा फटका इतका जोरदार होता की चेंडू थेट सीमारेषेपार गेला. युवराजने जून 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर त्यानेरणजी करंडक स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले, परंतु त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, आयपीएल स्पर्धेच्या तोंडावर त्याने आपली तंदुरूस्ती सिद्ध करताना काही तडाखेबाज खेळी केल्या आहेत. 
युवराजचा switch hit पाहा... 


रणजीच्या 2018-19च्या मोसमात युवराजला 14 सामन्यांत 99 धावा करता आल्या. मात्र, 37 वर्षीय युवराज आयपीएलसाठी सज्ज होत आहे. तत्पूर्वी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 21 फेब्रुवारी सुरू होत आहे. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटीच्या मुळ किमतीत चमूत दाखल करून घेतले आहे. आयपीएलमध्ये युवराज प्रथमच मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. 2018मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला आठ सामन्यांत केवळ 65 धावा करता आल्या आणि पंजाबने त्याला करारमुक्त केले. 

मुंबईत पार पडलेल्या डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत युवीने वादळी खेळी केली होती. त्याने एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना 57 चेंडूंत 80 धावा चोपल्या होत्या. मात्र, मुंबई कस्टम्स संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. एअर इंडियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले त्यानंतर युवराजने तिसऱ्या विकेटसाठी पॉल वॅल्थॅटीसह 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने सुजीत नायकसह 88 धावांची भागीदारी करताना संघाला 7 बाद 169 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई कस्टम्सच्या विक्रमांत औटी ( 52 चेंडूंत नाबाद 86) आणि स्वप्निल प्रधान ( 53 चेंडूंत 67 धावा) करत एअर इंडियाला पराभूत केले. 

Web Title: Yuvraj Singh smashes a six with a brilliant switch hit - Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.