युवराजच्या चाहत्यांसाठी खूशखबर; कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी!

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे नुकतेच जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:13 PM2019-06-26T12:13:36+5:302019-06-26T12:13:55+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh likely to feature in Euro T20 Slam  | युवराजच्या चाहत्यांसाठी खूशखबर; कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी!

युवराजच्या चाहत्यांसाठी खूशखबर; कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्यामुळे युवीनं आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मुळात त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी हवी होती आणि त्यासाठीच त्यानं निवृत्ती पत्करली. आता ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनंतर युवी युरो ट्वेंटी-20 लीगमध्येही खेळणार असल्याचे समजत आहे. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथे 30 ऑगस्ट व 22 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

युरो ट्वेंटी-20 स्लॅमच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांनी या लीगमध्ये भारताचे आणखी काही खेळाडू सहभाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ''बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळता येत नव्हतं. त्यामुळे काही भारतीय खेळाडूंना निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंग हा त्यातलाच एक खेळाडू आहे आणि युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये खेळण्याची त्यानं इच्छा व्यक्त केली आहे.''

''भारतीय खेळाडू हे आमच्यासाठी मोठं मार्केट मिळवून देणारे आहेत. युवराज सिंग सारखा खेळाडू या लीगमध्ये खेळल्यास आम्हालाच फायदा होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी भारतीय खेळाडूंना करारबद्ध करण्यात येईल. या लीगचा ड्राफ्ट 19 जुलैला लंडन येथे काढला जाईल,''असे जोन्स यांनी सांगितले.

युवराज व्यतिरिक्त पंजाबचा मनप्रीत गोनीही ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार आहे. युवीनं युरो ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याचे निश्चित केल्यास एबी डिव्हिलियर्स, आंद्रे रसेल, डेल स्टेन आणि इम्रान ताहीर यांच्या पंक्तित बसेल. स्टेन व रसेल यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पण, ते युरो ट्वेंटी-20 स्लॅमपूर्वी तंदुरूस्त होतील अशा विश्वास जोन्स यांनी व्यक्त केला.

या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीही खेळणार आहे. शिवाय ख्रिस लीन, बाबर आजम, ल्युक राँची, जेपी ड्यूमिनी यांचाही सहभाग असल्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथील प्रत्येकी दोन संघ या लीगमध्ये खेळणार आहेत.

Web Title: Yuvraj Singh likely to feature in Euro T20 Slam 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.