भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची 'यो-यो' फिटनेस टेस्ट, नापास होणाऱ्याला मिळणार डच्चू

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपली फिटनेस यो-यो टेस्टद्वारे सिद्ध करावे लागते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 02:00 PM2018-06-09T14:00:39+5:302018-06-09T14:00:39+5:30

whatsapp join usJoin us
Yo-Yo fitness test for every player of the Indian team dropped, | भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची 'यो-यो' फिटनेस टेस्ट, नापास होणाऱ्याला मिळणार डच्चू

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची 'यो-यो' फिटनेस टेस्ट, नापास होणाऱ्याला मिळणार डच्चू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - अफगाणिस्तान विरोधात होणारा एकमेव कसोटी सामना आणि इंग्लंड विरोधात होणाऱ्या मालिकेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना यो-यो ही फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. यामध्ये या टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास संघातून वगळले जाणार आहे.  
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, यो-यो मध्ये पास न झालेल्या खेळाडूला भारतीय संघातून डच्चू मिळणार आहे. अफगाणिस्तान विरोधात खेळाणाऱ्या संघाची यो-यो टेस्ट शनिवार-रविवार होणार आहे. तर आयरलँड आणि इंग्लंडविरोधात होणाऱ्या मालिकेसाठी 15 जून रोजी यो-यो टेस्ट होणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपली फिटनेस यो-यो टेस्टद्वारे सिद्ध करावे लागते. 

खेळाचा वेग आणि खेळाचे प्रमाण दोन्ही सध्याच्या काळात वाढले आहेत. त्यामुळे फिटनेस हा सर्वात मोठा मुद्दा आहे ज्यावर तडजोड करणे भारतीय संघाला नक्कीच परवडणारे नाही. त्यासाठी यो यो फिटनेस टेस्ट या फुटबॉलमधील फिटनेस टेस्टचा वापर करणे ही एक चांगली गोष्ट आहे. नवीन संकल्पनांचा कायमच संघाने स्वीकार करायला हवी, जेणेकरून आपण कोणत्याही संघापेक्षा मागे राहणार नाही. भारतीय संघातील विराट कोहली, एमएस धोनी, रवींद्र जडेजा या खेळाडूंच्या देहबोलीतून ही गोष्ट कायमच दिसते. 

भारतीय संघाच फिटनेस बद्दलच धोरण -
भारतीय संघात यापुढे निवड होताना कौशल्य हा एकमेव पात्रता यापुढे असणार नाही याचे स्पष्ट संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. संघात निवड होण्यासाठी फिटनेसला प्राधान्य राहणार असून त्यांनतर कौशल्याचा विचार केला जाणार आहे.

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे? -
क्रिक ट्रॅकर वेबसाइटनुसार यो यो फिटनेस टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ जेन्स बँग्सबो यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला आहे. यात लेवल एक आणि दोन असे प्रकार आहेत. 

कशी वापरली जाते? - 
लेवल एक हा प्रकार अगदी बीप टेस्ट सारखाच आहे परंतु दोन मध्ये एकदम वेगाने धावणे आणि वेळोवेळी त्यात वाढ करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. यात 20 मीटर अंतरावर मार्किंग कॉन्ज ठेवले जातात. यात सुरुवातीला हळू हळू सुरु होणारे धावणे बीपच्या आवाजाप्रमाणे वाढत जाते. यात सर्व काम आजकाल सॉफ्टवेअरच्या मदतीने केले जाते.

किती वेळ ?
यो यो फिटनेस टेस्ट ही लेवल एक साठी सहा ते 20 मनिटे तर लेवल दोन मध्ये दोन ते दहा मिनिटे चालते. 

या खेळातही वापरली जाते ही पद्धत? -
गेली अनेक वर्ष फुटबॉल आणि हॉकी या खेळांमध्येही पद्धत वापरली जाते. या दोन्हीतील यो यो टेस्टचे निकाल हे क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आजकाल प्रो कबड्डीचा सराव करतानाही कबड्डीपटू ही पद्धत वापरताना दिसत आहेत.

क्रिकेट खेळणारा हा देश देश यात सर्वात पुढे आहे? -
क्रिकेटपटूंसाठी यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये 19.5 हा उत्तम स्कोर समजला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यात अग्रस्थानी असून त्यांचा साधारण स्कोर हा 21 असतो.

भारतीय खेळाडूंमध्ये कुणाचा आहे यो यो स्कोर सर्वात जास्त? -
भारतीय संघातील मनीष पांडे या खेळाडूचा यो यो स्कोर सर्वात जास्त आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजाचा क्रमांक लागतो. भारतीय संघातील हे खेळाडू बऱ्याच वेळा 21 च्या आसपास जातात.

90 च्या दशकातील भारतीय खेळाडूंचा यो यो टेस्टमधील स्कोर -
पूर्वीच्या काळात बीप टेस्ट ही खेळाडूंमध्ये एक फॅशन होती. भारतीय खेळाडू त्यावेळी या टेस्टमध्ये अंदाजे 16 ते 16.5 स्कोर करत असत. यात मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंग आणि अजय जडेजा आघाडीवर असत.

पाहा  व्हिडिओ - 

Web Title: Yo-Yo fitness test for every player of the Indian team dropped,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.