इतिहास रचण्यासाठी महिला संघ सज्ज; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर असलेला भारतीय महिला संघ तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातल्यानंतर टी-२० मध्येसुद्धा भारतीय महिलांची विजयी घोडदौड सुरू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:15 AM2018-02-18T01:15:48+5:302018-02-18T01:16:05+5:30

whatsapp join usJoin us
Women's team ready to form history; Today's match against South Africa | इतिहास रचण्यासाठी महिला संघ सज्ज; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना

इतिहास रचण्यासाठी महिला संघ सज्ज; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर असलेला भारतीय महिला संघ तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातल्यानंतर टी-२० मध्येसुद्धा भारतीय महिलांची विजयी घोडदौड सुरू आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणाºया भारतीय महिला संघाने हा सामना जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन मालिका विजयाचे पराक्रम त्यांच्या नावे होतील. तसेच या मालिका विजयाने आॅस्ट्रेलियाबरोबरच दक्षिण आफ्रिकेतही भारतीय महिला टी-२० मधील आपला दबदबा दाखवतील.
महिलांच्या सामन्यानंतर याच मैदानावर भारतीय पुरुष संघ आपल्या टी-२० मालिकेची सुरुवात करणार आहे. मालिकेत भारतीय महिला संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट झाले असून पहिला सामना सात गड्यांनी, तर दुसरा सामना नऊ गडी राखून जिंकला. अनुभवी मिताली राजने टी-२० मध्ये नेतृत्वाचा भार स्वीकारलेला नसला तरी दोन्ही सामन्यांत अर्धशतके ठोकून दोन्ही विजयांमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे.
झूलनच्या जागी रूमेली धर
दुखापतग्रस्त झूलन गोस्वामी हिच्या जागी अनुभवी अष्टपैलू खेळाडू रूमेली धर हिचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), नुजहत परवीन (यष्टिरक्षक), पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तारकर, राधा यादव, रूमेली धर.

Web Title: Women's team ready to form history; Today's match against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.