Women took an unbeaten century, an attacking century in memory | महिलांनी घेतली विजयी आघाडी,स्मृती मानधनाचे आक्रमक शतक

किम्बर्ले : सलामीवीर स्मृती मानधनाच्या तडाखेबंद १३५ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी दुस-या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली.
या विजयामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी वूमेन्स चॅम्पियनशिपमध्ये २-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. डावखुºया स्मृती मानधनाने १२९ चेंडूंतच केलेल्या १३५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने ३ बाद ३0२ धावांचा एव्हरेस्ट उभारला. स्मृतीने तिच्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एक षटकार ठोकला. मानधनाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेतील हे दुसरे शतक ठरले. याआधीच्या लढतीत मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेतील भारताच्या विजयात ९८ चेंडूंत ८४ धावांची नेत्रदीपक खेळी केली होती.
स्मृती मानधनाशिवाय हरमनप्रीत कौरने नाबाद ५५ आणि वेदा कृष्णमूर्तीने नाबाद ५१ धावांचे योगदान दिले. भारतीय महिला फलंदाजांच्या स्फोटक खेळीसमोर दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज हतप्रभ दिसत होते. त्यांना फक्त ३ गडी बाद करता आले. त्यांच्याकडून स्युन लुस हिने ३१ धावांत १ गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
>गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
पहिल्या वनडेप्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी दुसºया वनडेतही जबरदस्त कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेला ३0.५ षटकांत अवघ्या १२४ धावांत गुंडाळले. लेगस्पिनर पूनम यादव हिने भारताकडून सर्वाधिक २४ धावांत ४ गडी बाद केले. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. भारताची वेगवान गोलंदाज झुल्लन गोस्वामी हिने आणखी एक मैलाचा दगड पार करताना २00 वनडे विकेटस् घेणारी पहिली महिला गोलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला. ३५ वर्षीय गोस्वामीने १६६ व्या लढतीत लारा वूलवार्ट हिला बाद करीत २00 वा बळी मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून लिजेल ली हिने एकाकी झुंज देताना ७५ चेंडूंत ७३ धावा केल्या. ती आणि मारिजेन कॅप (१७) या दोघीच आफ्रिकेकडून दुहेरी आकडी धावा फटकावू शकल्या.
>झूलनने पूर्ण केले बळींचे
‘द्विशतक’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसºया एकदिवसीय सामन्यात अनुभवी दिग्गज वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घालताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणाºया पहिल्या महिला खेळाडूचा मान मिळवला. कारकिर्दीत्तील १६६ वा एकदिवसीय सामना खेळताना ३५ वर्षीय झूलनने सलामीवीर लारा वूलवॉर्ट हिला बाद करुन २०० वा बळी मिळवला. दखल घेण्याची बाब म्हणजे पुरुष एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वप्रथम २०० बळींचा टप्पा पार करणारा गोलंदाज भारतीय होता. दिग्गज कपिल देव यांनी हा पराक्रम केला होता. मे २०१७ मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम रचताना झूलनने आॅस्टेÑलियाच्या कॅथरीन फिट्जपॅट्रिकचा सुमारे दशकभराचा विक्रम मोडित काढला होता.
>संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ : ५0 षटकांत ३ बाद ३0२ धावा. (स्मृती मानधना १३५, हरमनप्रीत कौर नाबाद ५५, वेदा कृष्णमूर्ती नाबाद ५१; स्युन लुस १/३१) वि.वि. बाद क्रम : १-५६, २-१०७,
३-२४१.
दक्षिण आफ्रिका : ३0.५ षटकांत सर्वबाद १२४ धावा. (लिजेल ली ७३; पूनम यादव ४/२४, राजेश्वरी गायकवाड २/१४, दीप्ती शर्मा २/३४). बाद क्रम : १-३२, २-५१, ३-६४, ४-६८, ५-८९, ६-९२, ७-११३, ८-११३, ९-१२४, १०-१२४.


Web Title: Women took an unbeaten century, an attacking century in memory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.