...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा

भारतीय टीमचा सलामीवीर रोहित शर्माने 5 व्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरोधात लगावलेल्या 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन न केल्याचं कारण सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 09:28 AM2018-02-15T09:28:59+5:302018-02-15T09:29:41+5:30

whatsapp join usJoin us
Why Rohit Sharma didn’t celebrate after scoring first ODI century in South Africa | ...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा

...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट एलिझाबेथ- भारतीय टीमचा सलामीवीर रोहित शर्माने 5 व्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरोधात लगावलेल्या 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन न केल्याचं कारण सांगितलं आहे. रोहित बरोबर झालेल्या गैरसमजामुळे कॅप्टन विराट कोहलीअजिंक्य रहाणे रनआऊट झाले.  दोन खेळाडू बाद झाल्यानंतर माझ्यावर दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे सामना खेळत असताना सुरू असलेली खेळी कायम ठेवण्याकडे लक्ष द्यायचं होतं, असं रोहित शर्माने म्हंटलं. 

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 73 धावांनी पराभाव करत सीरिज 4-1 ने आपल्या नावे केली. रोहितने मॅचनंतर म्हंटलं की, माझ्या आधी दोन खेळाडू  रनआऊट झाले होते त्यामुळे सेलिब्रेशन करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. दोन खेळाडू बाद झाल्यानंतर मला माझा सुरू असलेला खेळ तसाच ठेवायचा होता. सेलिब्रेशनचा विचारही डोक्यात नव्हता, असं रोहित शर्माने म्हंटलं. 
दक्षिण आफ्रिकेविरोधातील पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माचं योगदान महत्त्वाचं आहे. रोहितने पाचव्या वनडेमध्ये 115 धावा केल्या. टीम इंडियाच्या विजयासाठी रोहितचं हे रन्स मोलाचे समजले जातात. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याचं पहिलं शतक झळकावलं. 

सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे हे 15 वे शतक तर आंतरराष्ट्रीय करियरमधील 17 वे शतक आहे. रोहित शर्मानं विरेंद्र सेहवागच्या शतकाचाही विक्रम मोडीत काढला. सलामीवीर म्हणून सेहवागनं 14 शतके ठोकली आहेत. मंगळवारी रोहित शर्मानं 15 वे शतक झळकावत सेहवागचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माच्या पुढे आता फक्त सचिन तेंडूलकर(45) आणि गांगुली (19) हे दिग्गज आहेत. सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यामध्ये धवन 13 शतकासह पाचव्या स्थानावर आहे, 

Web Title: Why Rohit Sharma didn’t celebrate after scoring first ODI century in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.