बीसीसीआय माहितीच्या अधिकारात का नाही? ‘सीआयसी’ने उपस्थित केला प्रश्न

बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराच्या नियमाखाली का आणल्या जात नाही, असे केंद्रीय सूचना आयोगाने बीसीसीआय व क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:14 AM2018-07-13T05:14:58+5:302018-07-13T05:15:19+5:30

whatsapp join usJoin us
Why BCCI is not in the RTI? The CIC presented the question | बीसीसीआय माहितीच्या अधिकारात का नाही? ‘सीआयसी’ने उपस्थित केला प्रश्न

बीसीसीआय माहितीच्या अधिकारात का नाही? ‘सीआयसी’ने उपस्थित केला प्रश्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराच्या नियमाखाली का आणल्या जात नाही, असे केंद्रीय सूचना आयोगाने बीसीसीआय व क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
सूचना आयुक्त श्रीधर आचार्युलू म्हणाले, ‘प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेली ही अनिश्चितता रोखणे सीआयसीचे काम आहे. बीसीसीआयमध्ये पारदर्शितेचा अभाव आहे.’ क्रीडा मंत्रालयाला आयटीआयमध्ये गीता राणीने विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यावेळी हे प्रकरण उपस्थित झाले. बीसीसीआय भारताचे प्रतिनिधित्व करते आणि देशाच्या संघाची निवड करते, याबाबत गीता राणीने प्रश्न विचारला होता.
प्रश्नकर्त्याने विचारले की, बीसीसीआयतर्फे निवडण्यात आलेले खेळाडू त्यांच्यासाठी खेळतात की भारतासाठी. एक खासगी संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व कसे करू शकते. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघाची निवड करण्याचा अधिकार बीसीसीआयला देण्यात सरकारचा फायदा का ? मंत्रालयाने म्हटले की, त्यांच्याकडे याबाबत काही माहिती नाही. कारण बीसीसीआय आरटीआय अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. त्यामुळे आरटीआयचे अर्ज त्यांना देता येणार नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Why BCCI is not in the RTI? The CIC presented the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.