भारताची कर्णधार मिताली राज डान्स करते तेव्हा

भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी मैदानातच डान्स केला होता. पण तो डान्स बऱ्याच जणांनी पाहिलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:46 PM2018-07-31T16:46:40+5:302018-07-31T16:47:21+5:30

whatsapp join usJoin us
When India's captain Mithali Raj dance during the match | भारताची कर्णधार मिताली राज डान्स करते तेव्हा

भारताची कर्णधार मिताली राज डान्स करते तेव्हा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयसीसीने मात्र या डान्सचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

लंडन : भारताचे पुरुष क्रिकेटपटू बऱ्याचदा डान्स करताना आपल्याला दिसतात. पण भारताच्या महिला क्रिकेटपटूही यामध्ये मागे नाहीत. भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी मैदानातच डान्स केला होता. पण तो डान्स बऱ्याच जणांनी पाहिलेला नाही. आयसीसीने मात्र या डान्सचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ आहे इंग्लंडमधल्या विश्वचषकाचा. भारतीय संघ त्यावेळी दडपणामध्ये होता. त्यावेळी मितालीने चांगलाच ठेका धरला होता. यावेळी संघातील एकता बिश्तनेही मितालीला चांगली साथ दिली होती. मितालीने केलेल्या डान्स स्टेप्स एकताही करत होती. यावेळी संघातील स्मृती मानधना या दोघींचा डान्स पाहून हसू आवरता आले नव्हते.

मितालीने केलेला डान्स पाहा


Web Title: When India's captain Mithali Raj dance during the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.