जेव्हा त्यांनी शतक झळकावले, एकदाही भारत पराभूत झाला नाही...

पहिल्याच सामन्यात झळकावले होते शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 04:56 PM2019-02-12T16:56:40+5:302019-02-12T16:57:21+5:30

whatsapp join usJoin us
When he scored a century, India did not even lose ... | जेव्हा त्यांनी शतक झळकावले, एकदाही भारत पराभूत झाला नाही...

जेव्हा त्यांनी शतक झळकावले, एकदाही भारत पराभूत झाला नाही...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : एखादा फलंदाज जेव्हा शतक झळकावतो तेव्हा तो सामना आपल्या संघाने जिंकावा, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकवेळी तसे घडते असेच नाही. आतापर्यंत बऱ्याच महान फलंदाजांन शतक झळकावले, पण प्रत्येक सामन्यात संघ जिंकला असे घडले नाही. पण भारताचे माजी शैलीदार फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. आज विश्वनाथ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचा हा विक्रम सर्वासमोर आणत आहोत.

विश्वनाथ यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४९ साली कर्नाटक येथील भद्रावती येथे झाला. विश्वनाथ यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये १४ शतके लगावली. या १४ पैकी १३ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला, तर एक सामना अनिर्णित राहिला होता.

पहिल्याच सामन्यात झळकावले होते शतक
विश्वनाथ यांनी नोव्हेंबर १९६९ साली कानपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताकडून पदार्पण केले. पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले. पण त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी शतक झळकावले. दुसऱ्या डावात शैलीदार फलंदाजी करत विश्वनाथ यांनी १५ चौकारांसह १३७ धावांची खेळी साकारली होती.

पदार्पणात शतक झळकावणारे पहिले भारतीय
भारताकडून पदार्पण करताना शतक झळकावणारे विश्वनाथ हे पहिले फलंदाज ठरले होते. यापूर्वी एकाही फलंदाजाला पहिल्या सामन्यात शतक झळकावता आले नव्हते. विश्वनाथ यांनी पहिल्या सामन्यात १३७ धावा केल्या, यापैकी ९० धावा त्यांनी फक्त चौकाराच्या मदतीने केल्या होत्या. 

विश्वनाथ यांचे क्रिकेट करीअर
विश्वनाथ भारतासाठी ९१ कसोटी सामने खेळले. या ९१ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ४१.९३च्या सरासरीने ६०८० धावा केल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. विश्वनाथ यांनी १९८२ साली चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३७४ चेंडूंमध्ये २२२ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. या द्विशतकामध्ये ३१ चौकार लगावले होते. विश्वनाथ यांनी २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३९ धावा केल्या होत्या. यामध्ये ७५ ही त्यांनी सर्वोच्च धावसंख्या होती.

Web Title: When he scored a century, India did not even lose ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत