वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक मालिका विजय, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 10 विकेट्सनी मात

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा अचून मिलाफ साधत वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:06 AM2019-02-03T02:06:07+5:302019-02-03T02:06:54+5:30

whatsapp join usJoin us
West Indies' historic Test series win against England | वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक मालिका विजय, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 10 विकेट्सनी मात

वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक मालिका विजय, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 10 विकेट्सनी मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नॉर्थ साऊंड - भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा अचून मिलाफ साधत वेस्ट इंडिजनेइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात दणदणीत आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार जेसन होल्डर आणि केमार रॉच यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजनेइंग्लंडवर 10 विकेट्सनी मात केली आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने  तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. 

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करून संघाला तीनशेपार मजल मारून दिली. वेस्ट इंडिजकडून डरेन ब्राव्होने 50 धावा केल्या. अखेरीच वेस्ट इंडिजचा पहिला डाव 306 धावांवर संपुष्टात आला. मात्र तोपर्यंत वेस्ट इंडिजच्या खात्यात 119 धावांची आघाडी जमा झाली होती. 

त्यानंतर जेसन होल्डर अल्झारी जोसेफ आणि केमार रॉच यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डावही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला. जोस बटलर (24) याचा अपवाद वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. अखेरीस इंग्लंडचा दुसरा डाव 132 धावांत आटोपला. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि केमार रॉच  यांनी प्रत्येकी चार तर अल्झारी जोसेफ याने दोन बळी टिपले.

अखेरीस विजयासाठी मिळालेल्या 14 धावांच्या माफक आव्हानाचा वेस्ट इंडिजने आरामात पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. 

Web Title: West Indies' historic Test series win against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.