आयपीएलमुळे विंडीज क्रिकेटचे नुकसान - हूपर

आकर्षक कराराकडे लक्ष : व्यावसायिक लीगला मिळतेय प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 06:51 AM2018-10-05T06:51:08+5:302018-10-05T06:51:56+5:30

whatsapp join usJoin us
West Indies cricket loss due to IPL - Hooper | आयपीएलमुळे विंडीज क्रिकेटचे नुकसान - हूपर

आयपीएलमुळे विंडीज क्रिकेटचे नुकसान - हूपर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट : ‘आयपीएलमधील (इंडियन क्रिकेट लीग) आकर्षक करार मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्या आमच्या युवा खेळाडूंना ही लीग स्वत:कडे ओढते. यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटचे नुकसान होत आहे,’ अशी टीका माजी अष्टपैलू खेळाडू कार्ल हूपर याने केली. ‘विंडीजमधील प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंचे एकमेव लक्ष्य आयपीएल खेळणे हेच होऊन बसले आहे,’ असेही हूपर म्हणाला.

खेळाडू आणि विंडीज क्रिकेट बोर्डातील वाद जगजाहीर आहे. पण आयपीएलसारख्या दीर्घ लीगमुळे संघाच्या अडचणीत भर पडत असल्याचे हूपरचे मत आहे. विंडीजकडून १०२ कसोटी सामने खेळणारा हूपर कसोटी मालिकेत समालोचन करण्यासाठी १६ वर्षानंतर भारतात आला आहे. तो म्हणाला, ‘वेस्ट इंडिज क्रिकेटवर आयपीएलचा भक्कम पगडा आहे. टी-२० क्रिकेट कायम रहावे. आजच्या घडीला पाच वर्षांपूर्वीपेक्षा अधिक क्रिकेट खेळायला मिळत आहे. याचा फटका विंडीज क्रिकेटला बसला. आमचे युवा खेळाडू आयपीएलशी करारबद्ध होण्यास उत्सुक असतात.’

अ‍ॅडिलेड येथे शृंखलाबद्ध हॉटेल व्यवसायी बनलेला हूपर म्हणाला, ‘खेळाडू आयपीएलला प्राधान्य देत असतील तर कसोटीसह एकदिवसीय संघातील त्यांच्या उपलब्धतेविषयी शंका असते.’ वेतन वाद आणि जगातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य दिल्यामुळे ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, किएरॉन पोलार्ड आणि सुनील नारायण यांच्यासारखे खेळाडू राष्ट्रीय संघाकडे पाठ फिरवितात. याविषयी हूपरचे मत असे की, ‘आयपीएल तर सहा आठवडे चालते पण आमची स्थिती अशी आहे की २०१३ मध्ये विंडीजसाठी अखेरची कसोटी खेळलेल्या सुनील नारायणने यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. हीच स्थिती हुकमी फलंदाज ख्रिस गेल आणि किएरॉन पोलार्ड यांचीही आहे. पोलार्ड २६-२७ व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळला असता तर तो उत्कृष्ट खेळाडू बनू शकला असता. पण त्याने टी-२० ला प्राधान्य दिले. (वृत्तसंस्था)

चांगले कसोटीपटू गमावण्याची भीती
ईवीन लुईससारखा खेळाडूही झटपट क्रिकेटला प्राधान्य देत असल्याने आम्ही एकामागोमाग एक खेळाडू गमावत आहोत. हेटमायरसारख्या युवा खेळाडूची उद्या आयपीएल संघात निवड झाल्यास आम्ही चांगला कसोटीपटू गमावू शकतो,’ अशी भीतीही वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हूपरने व्यक्त केली.

Web Title: West Indies cricket loss due to IPL - Hooper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.