watch Video - sachin tendulkar playing cricket on road | VIDEO : क्रिकेटच्या देवाची रस्त्यावर बॅटिंग 
VIDEO : क्रिकेटच्या देवाची रस्त्यावर बॅटिंग 

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आज पाच वर्ष झाली आहेत. सचिनने क्रिकटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रिकेट खेळण्याचे वेड तसेच आहे.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सचिन रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळत आहे. हा व्हिडीओ सचिनचा दोस्त आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळीनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

सचिनची हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळतानाची ही दृश्यं रात्री उशिराची आहेत. तसंच मेट्रोच्या खोदकामासाठी व्यापलेला रस्ताही या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.  

माध्यमांच्या वृत्तानुसार, रविवारी रात्री वांद्र्यामध्ये हॉटेलात काम करणारी काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होती. त्याचवेळी सचिन तेंडुलकर तिथून गाडीतून निघाला होता. या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यानंही या मुलांबरोबर क्रिकेटचा आनंद लुटला. त्यावेळी सचिन सोबत विनोद कांबळीही हजर होता. त्यानं सचिन खेळतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. विनोद कांबळी आणि सचिन यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे हे आणखी एक उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.  


Web Title: watch Video - sachin tendulkar playing cricket on road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.