कोहलीचे ‘विराट’ वर्चस्व

२०१७ वर्ष क्रिकेटसाठी अत्यंत शानदार ठरले. अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन करताना हे वर्ष गाजवले. त्यामुळेच यंदाच्या वर्षाची ‘वर्ल्ड इलेव्हन’ टीम निवडताना खूप रोमांचक ठरले. पण त्याचवेळी हे सोपे ठरले नाही. कारण, संघातीक प्रत्येक स्थानासाठी अनेक खेळाडू दावेदार होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 01:35 AM2017-12-31T01:35:19+5:302017-12-31T01:48:47+5:30

whatsapp join usJoin us
 Virat Kohli's 'Virat' domination | कोहलीचे ‘विराट’ वर्चस्व

कोहलीचे ‘विराट’ वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
  
जागतिक संघ निवडताना ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी खेळाडूंच्या विजयी कामगिरीला प्राधान्य दिले. कसोटी संघ निवडताना खेळाडूंच्या संघविजयातील योगदान ध्यानात ठेवले गेले. भारतीय खेळाडूंनी यामध्ये आपली छाप पाडताना क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये वर्चस्व राखले. भारताने जबरदस्त खेळ करताना वर्षभराच्या कालवधीमध्ये कसोटीमध्ये अव्वल स्थान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे स्थान, तर टी२० मध्ये तिसरे स्थान पटकावत या वर्षाचा निरोप घेतला. इतर कोणत्याही संघाकडून असे सातत्य पहायला मिळाले नाही.
वर्षभरातील कामगिरी पाहता कर्णधार विराट कोहली तिन्ही संघामध्ये स्थान मिळवण्याचा दावेदार असल्याचे स्पष्ट होते. त्याच्या धावा काढण्यातील सातत्य व नेतृत्वातील आक्रमकता या जोरावर भारत जगातील बलाढ्य संघ ठरला. कोहलीचे योगदान शानदार ठरले. याशिवाय अन्य दोन खेळाडू असे आहेत, जे क्रिकेटच्या तिन्ही संघामध्ये स्थान मिळवण्याची क्षमता राखून आहे. पण दुर्दैवाने त्यांना एकाही संघात जागा मिळाली नाही. यापैकी इंग्लंडच्या बेन स्टोक्सला वगळले. सध्या तो आंतरराष्ट्रीय खेळाडू व दिग्गजांचा अनादर केल्याप्रकरणी बंदीला सामोरा जात आहे. दुसरा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला. तोही तिन्ही संघात स्थान मिळवण्याचा दावेदार, परंतु आमला पूर्णपणे अपयशी ठरला.

कसोटी संघ 

विराट कोहली (कर्णधार, भारत) :
रनमशीन ठरलेल्या कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोºयाने धावा काढल्या. त्याने एकूण १०५९ धावा काढताना एका द्विशतकासह ५ शतक झळकावले ते जबरदस्त सरासरी आणि स्ट्राईक रेटच्या जोरावर. आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर त्याने भारताला अव्वल स्थानी नेले. विशेष म्हणजे कर्णधारपदाचा त्याच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही.


वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक, भारत) : साहा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी खेळाडू ठरला. त्याचे यष्टीरक्षण खास करुन फिरकी गोलंदाजीवर जबरदस्त ठरले. त्याचवेळी त्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये दमदार फलंदाजीही केली.

मिशेल स्टार्क (आॅस्ट्रेलिया) : दुखापग्रस्त राहिल्याने स्टार्क वर्षभरात जस्त बळी घेणारा गोलंदाज ठरु शकला नाही. पण जेव्हा स्टार्क तंदुरुस्त असतो, तेव्हा तो वेग आणि स्विंग या जोरावर सर्वात घातक गोलंदाज ठरतो. सध्या सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला याची प्रचिती आली आहे.

डेव्हीड वॉर्नर (आॅस्ट्रेलिया) : भारतामध्ये येताना वॉर्नर खूप बढाया मारत आला खरा, पण हा मालिकेत सर्वात घाबरलेला सलामीवीर भासला. मात्र, घरच्या मैदानावर अ‍ॅशेस मालिकेत जबरदस्त कमागिरी केली. त्याने शिखर धवन आणि अ‍ॅलिस्टर कूकला मागे टाकले हेच एक कोडे आहे.

स्टीव्ह स्मिथ (आॅस्ट्रेलिया) :
स्मिथने वर्षभरात सर्वाधिक धावा करत वर्चस्व राखले. यामुळे त्याची तुलना महान फलंदाज ब्रॅडमॅन यांच्याशी झाली. प्रत्येक ठिकाणी त्याने मोठ्या खेळी करताना जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले.

यासिर शाह (पाकिस्तान) : अप्रतिम लेगस्पिनर असलेला यासिर विविध युक्त्या करुन मारा करतो. याद्वारे तो फलंदाजांना गोंधळात टाकून प्रत्येक ठिकाणी बळी मिळतो. त्याचबरोबर सतत हसतमुख राहिल्याने तो कायम ताजातवाना राहतो.

कागिसो रबाडा (द. आफ्रिका) : हा जलद गतीने शिकणारा वेगवान गोलंदाज ठरला. अनिश्चित टप्प्यावर मारा करत रबाडा पाटा खेळपट्टीवरही चेंडूला अनपेक्षित उसळी देतो. रबाडा भारताला धक्का देऊ शकतो.

चेतेश्वर पुजारा (भारत) : भारतीय संघातील मजबूत फलंदाज असलेल्या पुजाराने वर्षभरात दुसºया क्रमांकाच्या सर्वाधिक धावा (११४०) फटकावल्या. आॅस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या मालिकेत तो भारतासाठी तारणहार ठरला होता.

रविचंद्रन आश्विन (भारत) :आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिआॅनला मागे टाकून वर्षात सर्वाधिक बळी घेणाºया आश्विनने माझ्या संघात स्थान मिळवले. याचे कारण म्हणजे त्याचे फलंदाजीतील योगदान. उत्कृष्ट फलंदाजीमुळे आश्विन संघात ५ गोलंदाज खेळविण्याची संधी निर्माण करतो. यावर्षी त्याने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत ३०० बळी मिळवण्याचा पराक्रम केला.

डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका) : सलामीवीर म्हणून वर्षभरात डीनने सर्वाधिक धावा (११२८, सरासरी ५३.७१) फटकावल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आघाडीवर राहत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत करण्यात पुढाकार घेतला. हा शैलीदार फलंदाज नसला तरी, आव्हानात्मक आणि चिवट नक्कीच आहे.

जेम्स अँडरसन (इंग्लंड) :
कारकिर्दीच्या अखेरीस अँडरसन परिपूर्ण खेळाडू दिसत आहे. चेंडू स्विंग करण्याची जबरदस्त क्षमता असून तो जुना चेंडू चांगल्याप्रकारे रिव्हर्स स्विंगही करतो. महत्त्वाचे म्हणजे फलंदाजांची मानसिकता तो चांगल्याप्रकारे ओळखतो.

१२ वा खेळाडू : फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)

एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार, भारत) :
यंदा कोहलीने सर्वाधिक १,४६० धावा कुटल्या. त्याने भारताचे शानदार नेतृत्व करताना प्रत्येक मालिका जिंकली. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांचा विश्वविक्रम मोडण्याची तो क्षमता राखून आहे.

रोहित शर्मा (भारत) : रोहित शर्माचे महत्त्व त्याच्या आकडेवारीवरुन कदाचित सिद्ध होणार नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची तिसरी द्विशतकी खेळी जबरदस्त होती. त्याने कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारताचे नेतृत्व करताना लंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकाही जिंकली.

उपुल थरंगा (श्रीलंका) :
यंदाच्या वर्षी कोहली आणि रोहित शिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा फटकावणारा एकमेव फलंदाज. परंतु, तरीही थरंगाची कामगिरी झाकोळली गेली, कारण त्याच्या संघाची कामगिरी वर्षभरात अत्यंत खराब झाली.


बाबर आझम (पाकिस्तान) :
यंदाच्या वर्षात पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेल्या बाबरने ८७२ धावा केल्या आहेत. त्याने प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध धावा केल्या आहेत. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावयलाआवडते.

जो रुट (इंग्लंड) :
एक कसोटी फलंदाज म्हणून रुटची ओळख आहे, पण यंदा त्याच्यासाठी एकदिवसीय क्रिकेट खूप चांगले ठरले. त्याने वर्षभरात १९ सामने खेळताना ९८३ धावा फटकावल्या. विशेष म्हणजे त्याने ७०.२१ च्या जबरदस्त सातत्याने सरासरीने धावा केल्या.

महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, भारत): संघातील त्याचा समावेश काहीसा वाद निर्माण करणार असेल, पण त्याने ६०.६१च्या सरासरीने ७८८ धावा फटकावत भारताला अनेक थरारक सामने जिंकून दिले. तो अजूनही मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा सर्वोत्तम यष्टीरक्षक असून आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने इतरांना मागे टाकले आहे.

हार्दिक पांड्या (भारत) :
यंदाचे वर्ष या युवा अष्टपैलू खेळाडूसाठी लक्षवेधी ठरले. १५० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने त्याने महत्त्वपूर्ण धावा केल्या. तसेच हार्दिकने सातत्याने आणि कमी धावांमध्ये बळी घेत वेगवान गोलंदाज म्हणूनही छाप पाडली.

हसन अली (पाकिस्तान) :
एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज बनण्याच्या दिशेने हसन अलीची वेगाने वाटचाल सुरु आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मागे वळून पाहिलेले नाही. आपला सर्वोत्तम वेगवान मारा करताना हसन सातत्याने शानदार कौशल्य सादर करतो.

जसप्रीत बुमराह (भारत) :
भेदक यॉर्कर, वेगामध्ये चलाखीने करणारा बदल आणि जबरदस्त नियंत्रण यामुळे तो निर्विवादपणे डेथ ओव्हर्समधील सर्वोत्तम गोलंदाज ठरतो. त्याने सध्या फक्त सुरुवात केली आहे, त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन पुढे यायचे बाकी आहे.

टेÑंट बोल्ट (न्यूझीलंड) :
आॅस्टेÑलियाच्या मिशेल स्टार्कप्रमाणेच टेÑंट बोल्टही दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे. जगातील सर्वच मैदानावर तो धोकादायक आहेत. त्यातच गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असल्यास तो अत्यंत घातक ठरतो.

युझवेंद्र चहल (भारत) :
युवा लेगस्पिनर असलेला चहल वेगाने प्रगती करत आहे. त्यातच त्याने सर्वाधिक यश घरच्या मैदानावर मिळवले असल्याने आता सर्वांचे मत आहे, की तो इतर ठिकाणीही आपली गुणवत्ता दाखवण्यास सक्षम आहे.
१२वा खेळाडू : कुलदीप यादव (भारत)




टी ट्वेंटी

विराट कोहली (कर्णधार, भारत) : वर्षातील सरासरीवर कोहलीच्या कामगिरीचे विश्लेषण नका करु. हे दिशाभूल करणारे ठरेल, पण क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्याची सरासरी ५० हून अधिक आहे, हे विसरता कामा नये. फलंदाज व कर्णधार म्हणून त्याचा जबरदस्त प्रभाव पडला आहे.

एविन लेविस (वेस्ट इंडिज) : ख्रिस गेलसारख्या महत्त्वपूर्ण आणि अनुभवी खेळाडूला डावलून मी लेविसची दोन कारणांमुळे निवड केली. एक म्हणजे हा गेल प्रमाणेच गोलंदाजांचा कर्दनकाळ आहे आणि दुसरं म्हणजे हा वेस्ट इंडिज क्रिकेटचा भविष्य आहे.


रोहित शर्मा (भारत) : खरं म्हणजे, हाशिम आमला या स्थानासाठी दावेदार होता. पण रोहितला संधी मिळाली कारण, तो प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारे दबावाखाली आणतो. लंकेविरुद्ध त्याने झळकावलेले शतक चित्तथरारक होते.

एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) :
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विध्वंसक फलंदाज म्हणून मि. ३६० चे नावा आघाडीवर घ्यावे लागेल, यात दुमत नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो रोमांचक असून त्याने टी२० मध्ये स्वत:ची मोठी छाप पाडली आहे.

महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, भारत) : धोनी परंपरागत चौकटीतला यष्टीरक्षक नसला तरी जबरदस्त आहे. धोनी दरवेळी धुरा सांभाळतो आणि उत्कृष्ट फिनिशर आहे. तो परिस्थिती ओळखून असतो.

मोइसेस हेन्रीक्स (आॅस्टेÑलिया) : संघातील स्थानासाठी हेन्रीक्स व आफ्रिकेचा आक्रमक डेव्हिड मिल्लर यांच्यात कडवी चुरस होती. पण मी हेन्रीक्सला निवडले, कारण तो फलंदाजासोबतच संघासाठी तिसरा वेगवान गोलंदाज ठरु शकतो.

शोएब मलिक (पाकिस्तान) : विविध टी२० लीगमध्ये मलिकने छाप पाडली आहे. तो क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात भरवशाचा पाकिस्तानी खेळाडू आहे.

हसन अली (पाकिस्तान) :भेदक गोलंदाज हसनचे ‘लाइन लेंथ’वर जबरदस्त नियंत्रण आहे. हवेतच चेंडू स्विंग करताना हसनने यंदाचे वर्ष त्याने गाजवले आहे.

राशिद खान (अफगाणिस्तान) : राशिद यंदाच्या वर्षात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. १८वर्षीय राशिदची कामगिरी टी२० क्रिकेटसाठी उत्सुकता वाढवणारी आहे.

जसप्रीत बुमराह (भारत) : बुमराहने एकदिवसीयहून चांगली कामगिरी टी२० मध्ये केली. अप्रतिम नियंत्रणाच्या जोरावर तो कठीण गोलंदाज ठरतो. विशेष करुन डेथ ओव्हर्समध्ये तो धोकादायक ठरतो.

कुलदीप यादव (भारत) : चायनामन डावखुरा लेगस्पिनर कुलदीपने वैविध्यपूर्ण माºयाच्या जोरावर फलंदाजांची शिकार केली. त्याने परिपक्व खेळ करत लक्ष वेधले.

१२वा खेळाडू : टेÑंट बोल्ट (न्यूझीलंड)

Web Title:  Virat Kohli's 'Virat' domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.