विश्वविजेत्या संघातील विराट कोहलीचा सहकारी आज विकतोय छोले-भटुरे

क्रिकेट संघात स्थान मिळाळे नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते याचा काही नेम नाही. 2008 साली अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:14 PM2017-11-13T19:14:38+5:302017-11-13T19:15:32+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli's co-workers in the World Cup squad | विश्वविजेत्या संघातील विराट कोहलीचा सहकारी आज विकतोय छोले-भटुरे

विश्वविजेत्या संघातील विराट कोहलीचा सहकारी आज विकतोय छोले-भटुरे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - क्रिकेट संघात स्थान मिळाळे नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते याचा काही नेम नाही. 2008 साली अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे. जगण्यासाठी सध्या रस्त्यावर छोले-भटुरे विश्वविजेत्या संघातील या खेळाडूला विकावे लागत आहे.
या खेळाडूचे नाव पेरी गोयल असे असून पेरी गोयलचे छोले भटुरे विकणारे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2008 मध्ये विराट कोहलीच्या टीम इंडियाने अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. रवींद्र जाडेजा, मनिष पांडे यासारखे खेळाडू या संघात होते. पेरी गोयलची याच संघात राखीव विकेट कीपर म्हणून निवड झाली होती. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
धोनी 2008 मध्ये भारतीय संघाची बांधणी सुरु होती. विराटच्या टीम इंडियाने त्याच वर्षी अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे त्या संघातून विराटसह आणखी नवे चेहरे धोनीला मिळाले. पेरी गोयलचे नावही त्यावेळी चर्चेत होते. पण पेरी गोयलला वर्ल्डकपनंतर स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी न करता आल्यामुळे त्याचे नाव मागे पडत गेले. 
पेरी गोयलला विश्वचषकाने हिरो बनवले होते. पण क्रिकेटमध्ये सातत्य राखता न आल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे. सध्या पेरी लुधियाना महापालिकेबाहेर छोले भटुरे विकतो. सोशल मीडियावर त्याची ही कहाणी व्हायरल होत आहे. पण त्याचे फेसबुक अकाऊंटवर पाहिले असता, तो एका कंपनीचा संचालक असल्याचे म्हटले आहे. पण अद्याप याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही.

Web Title: Virat Kohli's co-workers in the World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.