भारत-श्रीलंका लढत अनिर्णीत, कोहलीचे शतक, भुवनेश्वर व शमीचा भेदक मारा

कोलकाता : विराट कोहलीच्या शतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:34 AM2017-11-21T03:34:24+5:302017-11-21T03:34:42+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli's century in ODIs, Bhuvneshwar and Shami hit | भारत-श्रीलंका लढत अनिर्णीत, कोहलीचे शतक, भुवनेश्वर व शमीचा भेदक मारा

भारत-श्रीलंका लढत अनिर्णीत, कोहलीचे शतक, भुवनेश्वर व शमीचा भेदक मारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : विराट कोहलीच्या शतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; पण पाचव्या अखेरच्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे निर्धारित वेळपूर्वीच खेळ संपविल्यामुळे श्रीलंका संघाला ईडन गार्डन्सवर सोमवारी पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.
या लढतीत एकही दिवस पूर्ण ९० षटकांचा खेळ शक्य झाला नाही. आज केवळ ७५.४ षटकांचा खेळ झाला.
कोहलीने (नाबाद १०४) वैयक्तिक १८ वे कसोटी व ५० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर भारताने ८ बाद ३५२ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला आणि श्रीलंकेपुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतातर्फे सलामीवीर शिखर धवन (९४) व लोकेश राहुल (७९) यांनी अर्धशतके झळकावली.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेची भुवनेश्वर (८ धावांत ४ बळी), मोहम्मद शमी (२-३४), उमेश यादव (१-२५) यांच्या भेदक माºयापुढे २६.३ षटकांत ७ बाद ७५ अशी अवस्था झाली होती, त्या वेळी पंचांनी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.
भारताने पहिल्या डावात १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने २९४ धावांची मजल मारली होती. भारतातर्फे सर्व १७ बळी वेगवान गोलंदाजांनी घेतले. मायदेशात खेळताना फिरकीपटूला बळी घेता आला नाही, असे प्रथमच घडले. त्याआधी, विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसºया डावात दमदार मजल मारली. कोहलीने ३४८ व्या डावामध्ये ५० वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकताना सर्वांत कमी डावांमध्ये ५० आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याच्या द. आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)
>कोहलीचे शतकांचे अर्धशतक
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसºया डावात शतकी खेळी करताना शतकांचे अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला.
कोहलीने आपल्या आक्रमक शैलीला साजेशी खेळी करताना वेगवान गोलंदाज सुरंग लकमलच्या चेंडूवर एक्स्ट्रॉकव्हरच्या दिशेने षटकार ठोकून १८वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनप्रमाणे गुडघ्यावर बसून जल्लोष साजरा केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करणारा तो जगातील आठवा व भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा महान सचिन तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर १०० शतकांची नोंद आहे.
तेंडुलकरनंतर रिकी पॉन्टिंग (७१), कुमार संघकारा (६३), जॅक कॅलिस (६२), हाशीम आमला (५४), माहेला जयवर्धने (५४), ब्रायन लारा (५३) आणि कोहली (५०) यांचा क्रमांक लागतो.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये १८, तर वन-डे क्रिकेटमध्ये ३२ शतके झळकावली आहेत. त्याला अद्याप टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आहे. कसोटीमध्ये कोहली सर्वाधिक शतके झळकावणाºया भारतीय खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याने दिलीप वेंगसरकर (१७) यांना पिछाडीवर सोडले. आता तेंडुलकर (५१), राहुल द्रविड (३६), सुनील गावसकर (३४), वीरेंद्र सेहवाग (२३) व मोहंमद अझरुद्दीन (२२) हे त्याच्यापेक्षा आघाडीवर आहेत.
>धावफलक
भारत पहिला डाव : १७२. श्रीलंका पहिला डाव २९४. भारत दुसरा डाव : के. एल. राहुल त्रि. गो. लकमल ७९, शिखर धवन झे. डिकवेला गो. शनाका ९४, चेतेश्वर पुजारा झे. परेरा गो. लकमल २२, विराट कोहली नाबाद १०४, अजिंक्य रहाणे पायचित गो. लकमल ००, रवींद्र जडेजा झे. थिरिमाने गो. परेरा ०९, आर. आश्विन नाबाद ००, रिद्धिमान साहा झे. समरविक्रमा गो. शनाका ०५, भुवनेश्वर कुमार झे. परेरा गो. गामेगे ०८, मोहम्मद शमी नाबाद १२. अवांतर (१२). एकूण ८८.४ षटकांत ८ बाद ३५२ (डाव घोषित). गोलंदाजी : लकमल २४.४-४-९३-३, गामेगे २३-२-९७-१, शनाका २२-२-७६-३, परेरा १३-२-४९-१, हेराथ ६-१-२९-०.
श्रीलंका दुसरा डाव :- सदिरा समरविक्रमा त्रि. गो. भुवनेश्वर ००, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. शमी ०१, लाहिरू थिरिमाने झे. रहाणे गो. भुवनेश्वर ०७, अँजेलो मॅथ्यूज पायचीत गो. उमेश १२, दिनेश चांदीमल त्रि. गो. शमी २०, निरोशन डिकवेला पायचीत गो. भुवनेश्वर २७, दासुन शनाका नाबाद ०६, दिलरुवान परेरा त्रि. गो. भुवनेश्वर ००, रंगना हेराथ नाबाद ००. अवांतर (२). एकूण २६.३ षटकांत ७ बाद ७५. गोलंदाजी : भुवनेश्वर ११-८-८-४, शमी ९.३-४-३४-२, उमेश यादव ५-०-२५-१, जडेजा १-०-७-०.

Web Title: Virat Kohli's century in ODIs, Bhuvneshwar and Shami hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.