virat Kohli wants Dukes balls to be used in Test matches | भारतात खेळायला विराटला हवी इंग्लंडमधली 'ही' गोष्ट
भारतात खेळायला विराटला हवी इंग्लंडमधली 'ही' गोष्ट

ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहलीने घरच्या मैदानात खेळण्यासाठी इंग्लंडमधील एका खास गोष्टीची मागणी केली आहे.

मुंबई : सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला होता. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने घरच्या मैदानात खेळण्यासाठी इंग्लंडमधील एका खास गोष्टीची मागणी केली आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कोहली खेळला नव्हता. पण आता कर्णधारपद स्वीकारल्यावर कोहलीने इंग्लंडमधील एका गोष्टीची मागणी बीसीसीआयकडे केली आहे.

कोहलीने बीसीसीआयकडे भारतामध्ये खेळण्यासाठी इंग्लंडमधली ड्युक्स या क्रिकेट चेंडूची मागणी केली आहे. याबाबत कोहली म्हणाला की, " एसजी या चेंडूपेक्षा ड्युक्सचा दर्जा चांगला आहे. बऱ्याच देशांमध्ये ड्युक्स चेंडूंचाच वापरही केला जातो. त्यामुळे भारतामध्ये खेळतानाही ड्युक्स चेंडूचाच वापर करण्यात यावा. "


Web Title: virat Kohli wants Dukes balls to be used in Test matches
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.