Virat Kohli, in the veteran hospital before the first test | विराटला धक्का, पहिल्या कसोटीपूर्वीच 'हा' दिग्गज रुग्णालयात

केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटीला शुक्रवारुपासून सुरुवात होतं आहे. त्यापूर्वीच विराट कोहलीला धक्का बसला आहे. संघातील महत्वाचा गोलंदाज रविंद्र जाडेजा आजारी पडल्याचे वृत्त आहे.  त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या आव्हानाला कसं तोंड देतो हे पहावं लागणार आहे.  बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या दोन दिवसांपासून रविंद्र जाडेजाला त्रास जाणवत होता त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे.  

स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचं वैद्यकीय पथक जाडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. पुढील 48 तासात जाडेजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल असा अंदाज स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी जाडेजाचा संघात समावेश करायचा की नाही याचा निर्णय अंतिम दिवशी घेण्यात येईल. 

दरम्यान, य़ापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन पायाला झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार शिखर धवन पूर्णपणे फिट झाला असून तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध आहे.