अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारताचा पहिलाच कसोटी कर्णधार

अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:37 AM2018-12-10T11:37:19+5:302018-12-10T11:43:51+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli, India's first captain, has won the Test in South Africa, England and Australia | अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारताचा पहिलाच कसोटी कर्णधार

अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारताचा पहिलाच कसोटी कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअॅडलेड कसोटीतील विजयासह भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार

अॅडलेड -  अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्याबरोबरच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.  विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत. 

वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असल्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळणे के आव्हानात्मक मानले जाते. या देशांमध्ये भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी काही अपवाद वगळता. यथातथाच झाली आहे. दरम्यान,  या तिन्ही देशांपैकी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारताला विजय मिळवून देण्याची किमया सौरव गांगुलीने साधली होती. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेत संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. तर महेंद्र सिंह धोनीने भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने जिंकवले होते. पण त्याला ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. 

मात्र विराट कोहली आता गांगुली आणि धोनीला वरचढ ठरला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.  विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत. 
शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. 

Web Title: Virat Kohli, India's first captain, has won the Test in South Africa, England and Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.