अपंग मुलांसाठी विराट कोहलीने डावलली सुरक्षा, मनसोक्त गप्पा मारत काढले सेल्फी; व्हिडीओ व्हायरल 

By शिवराज यादव on Sat, November 11, 2017 10:19am

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र  विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र  विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे. आपल्यासाठी चिअर करणा-या अपंग मुलांसाठी विराट कोहली सुरक्षा डावलत त्यांच्यात पोहोचला आणि मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्या मुलांना आवरता आला नाही आणि त्यांनी आपला मोबाइल विराटकडे दिला. विराटनेही त्यांची इच्छा पुर्ण करत स्वत: त्यांच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढले. चार ते पाच वेळा त्याच्याकडे सेल्फीसाठी मोबाइल देण्यात आला, मात्र विराटने अजिबात घाई आणि चिडचिड न करता फोटो काढले आणि मुलांची इच्छा पुर्ण केली. 

विराट कोहली त्यावेळी विमातळावरुन बाहेर येत होता. त्यावेळी व्हिलचेअरवर बसलेली मुलं विराट कोहलीसाठी चिअर करु लागली. सुरक्षेच्या कारणास्तव सेलिब्रिटींना जास्त वेळ लोकांमध्ये न राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र 29 वर्षीय विराट कोहलीने मुलांसाठी थोडा वेळ हा नियम बाजूला ठेवला आणि मुलांची भेट घेतली. बसमध्ये चढण्याआधी विराट कोहलीने सर्व मुलांना ऑटोग्राफ दिला आणि सोबत सेल्फीही घेतले. काही मुलांनी यावेळी विराटला आपण काढलेली चित्रं दाखवली. विराटने त्याच्यावर ऑटोग्राफ देत त्यांना ती परत केली. आपल्या लाडक्या खेळाडूचा ऑटोग्राफ आणि सेल्फी मिळाल्याने मुलं प्रचंड आनंदात दिसत होती. 

 

विमानतळावर विराट कोहली आणि भारतीय संघ असल्याची माहिती मिळताच प्रचंज गर्दी झाली होती. यावेळी चाहत्यांनी कोहलीच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पराभूत केल्यानंतर भारत आता श्रीलंकेशी भिडणार आहे. 16 नोव्हेंबरला कोलकातामध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या कसोटी मालिकेत एक शानदार रेकॉर्ड करण्याची संधी भारताकडे आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ केल्यास मायदेशात कसोटी विजयाचे शतक साजरे होणार आहे. ही कामगिरी करणारा भारत तिसरा देश ठरेल. इतकेच नव्हे तर विराट कोहली देखील सर्वांत यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुस-या स्थानावर विराजमान होईल.

भारताचा मायदेशात लंकेकडून आतापर्यंत कसोटीत पराभव झालेला नाही. याआधी १९९३-९४ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केले आहे. यंदा तिन्ही सामने भारताने जिंकल्यास विजयाचे शतक साजरे होईल. आॅस्ट्रेलियाने मायदेशात २३४ आणि इंग्लंडने २१२ सामने जिंकले आहेत.

भारताने मायदेशात एकूण २६१ कसोटी सामने खेळले. त्यातील ९७ जिंकले. ५२ सामन्यात पराभव झाला. १११ सामने अनिर्णीत राहीले. एक सामना ड्रॉ तर एक टाय झाला. मायदेशात विजय मिळविणा-या देशांमध्ये भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेने ९८ विजय नोंदविले आहेत. त्यांना विजयाचे शतक गाठण्यासाठी पुढच्या वर्षापर्यत प्रतीक्षा करावी लागेल.  

संबंधित

विराट कोहली आणि रवी शास्त्रींमुळे धोनीचा कसोटीला रामराम ?
इंग्लंड दौ:यात चांगली कामगिरी करण्यावर भर : विराट कोहली

क्रिकेट कडून आणखी

India vs England 2nd One Day Live : महेंद्रसिंग धोनीच्या दहा हजार धावा
S. Africa Vs Srilanka Test : द. आफ्रिकेचा लाजीरवाणा पराभव, तीन दिवसांत श्रीलंकेची बाजी
India vs England : इंग्लंडला मोठा धक्का, हा स्फोटक फलंदाज मालिकेबाहेर
एकदिवसीय मालिका : मालिका जिंकण्यास भारत सज्ज
जागतिक अग्रस्थान भारताच्या दृष्टिक्षेपात

आणखी वाचा