विराट कोहलीनं रद्द केला वरळीतील 34 कोटीचा लक्झरी फ्लॅट

वरळीतील 34 कोटीच्या लक्झरी अपार्टमेंटचा सौदा रद्द केला आहे. आता ते मुंबईत नवे घर शोधत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 09:01 AM2018-03-23T09:01:48+5:302018-03-23T09:43:21+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli canceled over 34 crore luxury flats at Worli | विराट कोहलीनं रद्द केला वरळीतील 34 कोटीचा लक्झरी फ्लॅट

विराट कोहलीनं रद्द केला वरळीतील 34 कोटीचा लक्झरी फ्लॅट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील वरळीमध्ये 2016 मध्ये 34 कोटीं रुपयांचा फ्लॅट घेतला होता. पण आता या दापंत्यानं या फ्लॅटचा सौदा रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे. 20 मार्च रोजी विराट कोहलीने ओमकार रिटेलर्स अँड डेव्हलपर्स सोबतचा फ्लॅटचा सौदा रद्द केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार,  वरळीतील 34 कोटीच्या लक्झरी अपार्टमेंटचा सौदा करुन विराट-अनुष्का आता वांद्रे - वर्सोवा दरम्यान नवे पेंटहाऊस  शोधत आहेत. 

'इकॉनॉमिक टाइम्स'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार रिटेलर्स अँड डेव्हलपर्सच्या वरळीतील टॉवरमध्ये विराटनं हा फ्लॅट खरेदी केला होता. सी विंगमध्ये 35व्या मजल्यावर 7171 स्वेअर फुटाचा हा सुपर लक्झरी फ्लॅटचा सौदा झाला होता. गेले काही महिने हा व्यवहार सुरू होता आणि आता विराट-अनुष्कानं हा सौदा रद्द करुन वांद्रे - वर्सोवा दरम्यान नवे पेंटहाऊस शोधत आहेत. 

कसे होतं 34 कोटींच घर - 

‘ओमकार रिलेटर्स अॅण्ड डेव्हलपर्स रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट’ अंतर्गत वरळी येथे साकारण्यात आलेल्या ‘ओमकार १९७३’ या टॉवरमध्ये त्यांचा हा आशियाना असेल. ५ बीएचके, ‘सी फेसिंग व्ह्यू’ असणाऱ्या ७,१७१ चौरस फुटांच्या घरात ते राहणार होते. १३ फूट उंचीची प्रत्येक खोली असणाऱ्या या घरातून संपूर्ण शहराची सुरेख झलकही दिसणार असल्याचे म्हटले जाते होतं. ‘ओमकार रिलेटर्स’च्या या प्रोजेक्टमध्ये इनडोअर टेनिस कोर्ट, पेट क्लिनीक आणि लहान मुलांसाठी डे केअर सेंटरही होतं. मुख्य म्हणजे फक्त विराट कोहलीच नव्हे तर, क्रिकेटर युवराज सिंगनेसुद्धा याच इमारतीत २९ व्या मजल्यावर २०१३ मध्ये घर घेतले होते.  

सध्या भाड्याच्या घरात राहते विराट-अनुष्काची जोडी - 

विराट कोहली आणि अनुष्का सध्या मुंबईत ज्या फ्लॅटमध्ये राहत आहेत त्याचे मासिक भाडे 15 लाख रुपये आहे. राहेजा लेजंड बिल्डिंगमध्ये त्यांचे फ्लॅट 40 व्या मजल्यावर आहे. 2700 चौरस फुट एवढा या फ्लॅटचा आकार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट आणि राहेजा बिल्डर्स यांच्यात ही डील ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. विराटने 24 महिन्यांसाठी हा फ्लॅट भाड्यावर घेतला आहे. रेंटल अॅग्रीमेंट 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. विराटसोबतच अनुष्काने सुद्धा त्यावर स्वाक्षरी केली. हे फ्लॅट वर्सोव्हा येथे आहे. 

Web Title: Virat Kohli canceled over 34 crore luxury flats at Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.