भुवनेश्वर कुमारसमोर विराट कोहली झाला नतमस्तक, मैदानातच झुकून केला सलाम

भारतीय क्रिकेट संघाचा डेथ बॉलर म्हणून भुवनेश्रर कुमारने आपली ओळख निर्माण केली आहे. पण फक्त गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही भुवनेश्वरने ज्या गतीने प्रगती केली आहे ती पाहून कर्णधार विराट कोहली भलताच खूश दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 09:20 AM2017-10-23T09:20:49+5:302017-10-23T09:22:37+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli before Bhuvneshwar Kumar, bowed lowly, bowed in the field | भुवनेश्वर कुमारसमोर विराट कोहली झाला नतमस्तक, मैदानातच झुकून केला सलाम

भुवनेश्वर कुमारसमोर विराट कोहली झाला नतमस्तक, मैदानातच झुकून केला सलाम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा डेथ बॉलर म्हणून भुवनेश्रर कुमारने आपली ओळख निर्माण केली आहे. पण फक्त गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही भुवनेश्वरने ज्या गतीने प्रगती केली आहे ती पाहून कर्णधार विराट कोहली भलताच खूश दिसत आहे. न्यूझीलंडविरोधात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भलेही भारताचा पराभव झाला असेल, पण विराट कोहली आणि भुवनेश्वरच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. यासोबतच भारताविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, कोहलीचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारताची धावसंख्या मर्यादित राहिली. विराट कोहलीने केलेल्या 121 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडसमोर 281 धावाचं लक्ष्य ठेवण्यास भारताला यश मिळालं. 49 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारचा सामना होता अ‍ॅडम मिल्नेशी. त्यावेळी भारताची धावसंख्या होती 258 धावांवर सहा विकेट्स. भुवनेश्वर कुमार खालच्या फळीतील गोलंदाज असल्याचं समजून अ‍ॅडम मिल्ने याने बाऊंसर टाकला, पण भुवनेश्वर आधीच त्यासाठी तयार होता. भुवनेश्वरने बॉल लाँग-ऑनला मारत सीमारेषेपार केला. इतका सुंदर शॉट पाहून विराटला राहावलं नाही, आणि त्याने झुकून भुवनेश्वरला सलाम केला. 

धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून दिली. परंतु, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे गुप्टिल (३२), मुन्रो (२८) व कर्णधार केन विल्यम्सन (६) यांना झटपट बाद केल्याने न्यूझीलंडचा डाव बिनबाद ४८ वरून ३ बाद ८० असा घसरला. या वेळी भारत पुनरागमन करेल, अशी आशा होती.

परंतु, टेलर - लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय साकारला. टेलरने १०० चेंडूंत ८ चौकारांसह ९५ धावा केल्या, तर लॅथमने १०२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०३ धावांचा विजयी तडाखा दिला. विजयासाठी केवळ एका धावेची आवश्यकता असताना टेलर बाद झाला. यानंतर हेन्री निकोल्सने चौकार मारत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्का मारला. विशेष म्हणजे पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर दुसºया सराव सामन्यात टेलर - लॅथम यांनी वैयक्तिक शतक ठोकताना न्यूझीलंडला विजयी केले होते. त्याच खेळीची पुनरावृत्ती या दोघांनी वानखेडे स्टेडियमवर केली.

तत्पूर्वी, कोहलीने कारकिदीर्तील विक्रमी ३१ वे शतक झळकावताना भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली. कोहलीने १२५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १२१ धावांची शानदार खेळी केली. चौथ्या षटकात बोल्टने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने प्रथम धवन (९) आणि त्यानंतर रोहितला (२०) बाद करून भारताची ५.४ षटकांत २ बाद २९ अशी अवस्था केली. यानंतर, कोहली व केदार जाधव यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याने सलामी जोडी परतल्यानंतर पुढील ५ षटकांत भारताने केवळ ८ धावा काढल्या. त्यात वैयक्तिक २९ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला कॉलिन डी ग्रँडेहोमच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले.

एका बाजूने कोहली खंबीरपणे किल्ला लढवत असताना दुसºया टोकाकडून केदार जाधव (१२), दिनेश कार्तिक (३७), महेंद्रसिंह धोनी (२५) आणि हार्दिक पांड्या (१६) अपयशी ठरले. कोहली - कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून भरताची पडझड रोखली. अखेरच्या काही षटकांत भुवनेश्वर कुमारने १५ चेंडंूत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्यामुळे भारताला आव्हानात्मक मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी बोल्ट (४/३५) आणि टीम साऊदी (३/७३) यांनी अचूक मारा केला.

Web Title: Virat Kohli before Bhuvneshwar Kumar, bowed lowly, bowed in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.