शतक लगावल्यानंतर विराट कोहली आणि मुरली विजयचा डान्स

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयने केलेल्या दमदार खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:10 PM2017-12-02T19:10:04+5:302017-12-02T19:13:14+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and Murali Vijay's dance after century | शतक लगावल्यानंतर विराट कोहली आणि मुरली विजयचा डान्स

शतक लगावल्यानंतर विराट कोहली आणि मुरली विजयचा डान्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीतकर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 156 धावा तर सलामीवीर मुरली विजयच्या 155 धावांची खेळी

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयने केलेल्या दमदार खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 156 धावा आणि सलामीवीर मुरली विजयच्या 155 धावांच्या खेळीच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारताच्या चार बाद 371 धावा झाल्या आहेत. याआधी शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा 23-23 धावांवर आऊट झाले होते. मात्र मुरली विजयने संयमी खेळी करत मैदानावर टिकून राहिला. यावेळी त्याला साथ दिली ते कर्णधार विराट कोहलीने. 

लंचपर्यंत दोघांनाही जबरदस्त खेळी केली आणि आपलं शतक पुर्ण केलं. एकीकडे मुरली विजयने आपलं टेस्ट करिअरमधील 11 वं शतक पुर्ण केलं, तर कोहलीने विसावं शतक ठोकलं. यावेळी मुरली विजयन आपलं शतक पुर्ण केल्यावर असं काही केलं ज्यामुळे मैदानावरील उपस्थित प्रेक्षक आणि सहकारी खेळाडूंना हसू आवरलं नाही. मुरली विजयने शतक पुर्ण झाल्यानंतर डान्स करत आपला आनंद साजरा केला. शतक पुर्ण झाल्याच्या निमित्ताने मुरली विजय हात मिळवण्यासाठी कोहलीजवळ आला. यावेळी कोहली आणि मुरली विजयने दोघांनीही डान्सिंग पोज दिली. यावेळी प्रेक्षक मात्र हे सगळं एन्जॉय करत होते. 



 

विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. दरम्यान, तिसऱ्या आणि निर्णयाक लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नागपूर कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि के. एल राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी मोहम्मद शामी आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालं आहे. घरगुती कारणामुळे दुसऱ्या कसोटीतून शिखर धवन याने माघार घेतली होती.

दरम्यान, विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. 

नागपुरात दुस-या कसोटीत एक डाव २३९ धावांनी विजय मिळवित भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. याआधी ओळीने आठ मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या संघाने केली. कोटलावर सामना बरोबरीत राहिला तरीही सलग नऊ सामने जिंकण्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी भारत बरोबरी करेल. भारताने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका गमविली होती. तेव्हापासून भारताने नऊ मालिका खेळल्या व सलग आठ जिंकल्या. मायदेशात पाच तसेच श्रीलंकेत दोन व वेस्ट इंडिजमध्ये एक मालिका विजय साजरा केला. भारताने मागील २३ पैकी तब्बल १९ कसोटी सामने जिंकले. एकमेव सामना गमावला तो आॅस्ट्रेलियाविरुद्ध. द. आफ्रिका दौºयापूर्वी हा अखेरचा कसोटी सामना असेल्याने कोहलीच्या इच्छेनुसार कोटलाची खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यात येत आहे.

Web Title: Virat Kohli and Murali Vijay's dance after century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.