ठळक मुद्देटीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो.

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात फिट क्रिकटर्समध्ये विराटचं नाव मोजलं जातं. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो. वेब सिरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन'मध्ये विराट कोहलीने त्याच्या फिटनेस आणि डाएट प्लानबद्दल सांगितलं आहे. फिट राहण्याचा विराटचा मंत्रा त्याने या सिरीजच्या माध्यमातून सांगितला आहे.
जिममध्ये हार्ड ट्रेनिंगबरोबरच विराट दररोज योग्य डाएट फॉलो करतो. दिवसाच्या सुरूवातीला योग्य नाश्ता केला तर आरोग्यासाठी चांगलं असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. तोच रूल विराटही फॉलो करतो.

विराटच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश जास्त आहे. तीन अंड्यांचं ऑमलेट (व्हाइट एग), एक अख्खं अंड विराटच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये असतं. तसंच त्याबरोबर पालकाचा पदार्थ, चीजही नाश्त्यात असतं. पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगड ही फळ खाऊन विराट एक कप ग्रीन टी घेतो. सकाळी हेव्ही ब्रेकफास्ट करावा. हेच विराटकडून पाळलं जातं.

त्यानंतर प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर विराट आपल्या दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन, कुस्करलेले बटाटे, पालकाचा एखादा पदार्थ आणि इतर भाज्या खातो. रात्रीचं जेवण एकदम हलकं असायला हवं, असा सल्ला नेहमीचं डॉक्टरांकडून दिला जातो. विराट त्याच्या रात्रीच्या जेवणात विराट सी-फूड खातो.

बटर चिकन ही विराट कोहलीची सर्वात आवडती डीश आहे, असं नेहमीच त्याचा प्रत्येक फॅनकडून बोललं जातं. पण विराटने गेल्या ४ वर्षांमध्ये विराटने बटर चिकनला हातही लावलेला नाही. आपल्या फिटनेसकडे लक्ष देत विराट हेल्थी लाईफस्टाईलचे सगळे रूल फॉलो करताना दिसतो आहे.