अनुष्काबरोबर एन्जॉय करतोय कोहली आपली सुट्टी

आपल्या या सुट्टीचा चांगला फायदा कोहली उठवताना दिसत आहे. या सुट्टीत तो अनुष्काबरोबर वेळ व्यतित करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 07:24 PM2018-03-11T19:24:35+5:302018-03-11T19:24:35+5:30

whatsapp join usJoin us
virat Enjoying holidays with Anushka | अनुष्काबरोबर एन्जॉय करतोय कोहली आपली सुट्टी

अनुष्काबरोबर एन्जॉय करतोय कोहली आपली सुट्टी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेटपटूंच हे नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात. आपल्या कुटुंबियांनाही त्यांना जास्त वेळ देता येत नाही. जर एखाद्या क्रिकेटपटूची पत्नी सेलिब्रेटी असेल तर त्यांची भेट कधी कधी महिन्याभरातही होत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांना वेळ मिळते तेव्हा ते आपल्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठी प्राधान्य देतात. भारताचा कर्णधार विराट कोहलीचेही तसेच आहे.

सध्याच्या घडीला श्रीलंकेमध्ये निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पण या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. लग्नानंतर कोहली काही दिवसांतच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेत मालिका सुरु आहे. पण या मालिकेनंतर भारतामध्ये आयपीएल सुरु होणार आहे, त्यानंतर भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. हे सारे व्यस्त वेळापत्रक पाहता कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.


आपल्या या सुट्टीचा चांगला फायदा कोहली उठवताना दिसत आहे. या सुट्टीत तो अनुष्काबरोबर वेळ व्यतित करत आहे. अनुष्काबरोबरचा आपला फोटो कोहलीने ट्वीटरवर टाकला आहे.  अुनुष्काबरोबर आपली सुट्टी एन्जॉय करत असल्याचे कोहलीने सांगितले आहे.

Web Title: virat Enjoying holidays with Anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.