नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने, किंमत वाचून व्हाल थक्क

विराट-अनुष्काच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 02:59 PM2017-12-12T14:59:41+5:302017-12-12T15:36:06+5:30

whatsapp join usJoin us
Viraat started searching for a ring for three months; | नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने, किंमत वाचून व्हाल थक्क

नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने, किंमत वाचून व्हाल थक्क

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - विराट-अनुष्काच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे. लग्नातील प्रत्येक गोष्ट खास होती. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे विराटनं अनुष्काला दिलेली अंगठी. 

अनुष्कासाठीची अंगठी शोधण्यासाठी विराटला तब्बल तीन महिने लागले असल्याची चर्चा आहे. विराटनं अनुष्कासाठी जी अंगठी निवडली ती प्रचंड महागडी आणि खास आहे. या अंगठीमध्ये एक खास हिराही बसवण्यात आला आहे. ऑस्ट्रियाचा एका डिझायनरनं ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीची खासियत म्हणजे, ही अंगठी तुम्ही जेवढ्या अँगलमधून पाहाल तितक्यांदा तिची डिझाइन वेगवेगळी दिसेल. या अंगठीची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचीही चर्चा आहे. 

रिंग सेरेमनीत अनुष्काने वेल्वेट मरून साडी निवडली होती. साडीवर मोती आणि जरदोजी व मरोरी वर्क होते. यावेळी तिने घातलेल्या गळ्यातील सेटवर पर्ल चोकरसोबत डायमंडचे काम केले गेले होते. कानात मॅचिंग स्टड, केसांचा अंबाडा आणि त्यावर खोचलेले गुलाबाचे फुल अशा लूकमध्ये अनुष्का कमालीची सुंदर दिसत होती.

अनुष्काने लग्नात घातलेला लहंगा आणि दागिणेही असेच खास होते. अनुष्काचा लहंगा सब्यसाची यांनी डिझाईन केला होता. ६७ कारागिरांनी ३२ दिवस खपून तो तयार केला. पिंक कलरच्या या लहंग्यावर हाताने खास कढाई वर्क केले गेले होते.  विराटने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी घातली होती. यावर बनारसी कढाई काम केले गेले होते. शिवाय हस्तीदंताची विशेष कारीगिरी करण्यात आली होती. टसर फ्रॅबिकच्या स्टोलसह विराटने रोझ सिल्क चंदेरी पायजाम घातला होता.

Web Title: Viraat started searching for a ring for three months;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.