विक्रमवीर कोहली युवा फलंदाजांसाठी आदर्श

दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना टाय झाला. या सामन्यात ३२१ धावा केल्यावर भारत सहज जिंकेल, असे वाटत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:33 AM2018-10-26T03:33:38+5:302018-10-26T03:33:47+5:30

whatsapp join usJoin us
Vikramviar Kohli is ideal for youngsters | विक्रमवीर कोहली युवा फलंदाजांसाठी आदर्श

विक्रमवीर कोहली युवा फलंदाजांसाठी आदर्श

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-अयाझ मेमन />दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना टाय झाला. या सामन्यात ३२१ धावा केल्यावर भारत सहज जिंकेल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला. शाय होप आणि हेटमायर यांनी जबरदस्त फलंदाजी केली. तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर भारताने धावसंख्या मोठी उभारली होती, तसेच फिरकीपटू विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. हेटमायर याने सात चौकार लगावले. त्याचे शतक हुकले मात्र त्याने सर्वांनाच प्रभावीत केले. आयपीएलमधील टॅलेंट स्काऊटचे लक्ष आता त्याच्याकडे असेल.
शाय होप हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. अखेरच्या षटकांत १४ धावांची आवश्यकता होती. मात्र १३ धावा निघाल्या त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. मालिकेत विंडीजला अजून संधी आहे. पहिल्या सामन्यातील त्यांचा खेळ पाहता हा सामनाही भारत सहज जिंकेल, असे वाटत होते. मात्र फलंदाजांनी भारताला विजयापासून दूर ठेवले. या सामन्याने दाखवून दिले की कसोटी मालिका आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विंडीजच्या फॉर्ममध्ये किती अंतर आहे.
विराटचे दुसरे शतक आणि दहा हजार धावांचा टप्पा गाठणे ही या सामन्यातील सर्वात महत्त्वाची कहाणी होती. सचिन, सौरव, लारा या सारख्या दिग्गज खेळाडूंनाही न जमणारी कामगिरी विराटने केली आहे. सर्वात कमी डावात त्याने दहा हजार धावा केल्या आहेत. सचिनपेक्षा ५४ डाव कमी खेळून त्याने ही कामगिरी केली. त्याची धावांची भूक मोठी आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यात तो सर्वात चांगला फलंदाज आहे. त्याची विक्रमाची गाडी कुठे थांबेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र जेथे थांबेल तेथे नंतरच्या फलंदाजांना पोहचणे नक्कीच कठीण असेल.
सध्या विराट आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये तुलना केली जात आहे. सचिन हा विराटसाठी आदर्श आहे, तर रिचडर््स हे सचिनसाठी आदर्श होते. मला वाटते की तुलना फक्त करायची नसते. त्यातून अर्थ काढला जातो. आज क्रिकेट खेळ खूप बदलला आहे. रिचडर््स यांनी आपली संपूर्ण कारकिर्द लाल चेंडूने खेळली आहे. तसेच त्यांनी परदेश दौरे जास्त केले आहेत. शिवाय दिवसाच सामने खेळले आहेत.
सचिन यानेही आपली निम्मी कारकिर्द लाल चेंडूने खेळली. त्यानंतर पांढरा चेंडू आला. आणि दिवस- रात्रीचे सामने सुरू झाले. खेळातील बदलांना बाजुला सारले तरी मला वाटते की, त्यांच्यात एक क्षमता आणि कौशल्य आहे. त्याचा उपयोग करून धावा कशा काढायच्या हे आपण रिचर्डस्न आणि सचिनच्या फलंदाजीतून पाहिले. तेच आता विराट करत आहे. आपल्यासमोर आलेल्या संधीचा फायदा तो योग्यपद्धतीने घेत आहे. विराट हे सचिन आणि व्हिव्हियन रिचर्डसन यांच्याकडून शिकला आहे.
या तिन्ही खेळाडूंनी मेहनत आणि आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवले. गुणवत्ता खूप खेळाडूंमध्ये आहे. मात्र असे विक्रम फारच कमी खेळाडूंनी केले. कोहली स्वत:ला फिट ठेवतो,
तो नेहमीच शंभर टक्के देण्याचा
प्रयत्न करतो. तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. संघाला विजयी करून देण्यासाठी
तो प्रयत्न करतो. तो कधीच स्वत:च्या विक्रमाचा फारसा विचार करत
नाही. यामुळे विराट कोहली युवा फलंदाजांसाठी आदर्श आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याच्यासारखा फलंदाज नाही.
(संपादकीय सल्लागार)

Web Title: Vikramviar Kohli is ideal for youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.