Video : पृथ्वी शॉचा 'अपर कट' सेम टू सेम सचिन तेंडुलकर

Vijay Hazare : पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:01 AM2018-10-18T09:01:08+5:302018-10-18T09:03:58+5:30

whatsapp join usJoin us
Video: Prithvi Shaw 'Upper Cut' Same To Same like Sachin Tendulkar | Video : पृथ्वी शॉचा 'अपर कट' सेम टू सेम सचिन तेंडुलकर

Video : पृथ्वी शॉचा 'अपर कट' सेम टू सेम सचिन तेंडुलकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद : पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्टार खेळाडूंच्या पुनरागमनानंतर अत्यंत मजबूत बनलेल्या मुंबई संघाने अपेक्षित कामगिरी करताना  वन डे सामन्यात हैदराबादचा व्हीजेडी पद्धतीने ६० धावांनी पराभव केला. या सामन्यात 18 वर्षीय पृथ्वीने जोरदार फटकेबाजी केली. त्याने आंतरराष्ट्रीय गोलंदाज मोहम्मद सिराजची धुलाई करताना सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची आठवण करून दिली. 



मुंबईने २५ षटकांत २ बाद १५५ धावा अशी मजल मारल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. यानंतर खेळ सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी व्हीजेडी पद्धतीचा अवलंब केला. यानुसार मुंबईला विजयासाठी २ बाद ९६ धावा अशी कामगिरी करणे गरजेचे होते आणि येथेच मुंबईचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. विंडीजविरुद्ध जबरदस्त आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केलेल्या पृथ्वीने ४४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची वेगवान खेळी केली. हैदराबादने 8 बाद 246 धावा केल्या होत्या.


या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीने 8 व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीची लय बिघडवली. त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजच्या बाऊंसरवर अपर कट मारून चेंडू सीमारेषेपार पाठवला. पृथ्वीचा हा फटका पाहताच चाहत्यांना महान फलंदाज सचिन तेंडुलकरची आठवण झाली. पृथ्वीने सिराजच्या तीन चेंडूंवर 16 धावा केल्यानंतर रोहित शर्माने त्याला मिठी मारली. 


पाहा हा व्हिडीओ... 



 

Web Title: Video: Prithvi Shaw 'Upper Cut' Same To Same like Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.