यंदाच्या मोसमात खेळविणार दोन हजार सामने - बीसीसीआय

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्वेच्या राज्यांचा समावेश झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या आगामी देशांतर्गत मोसमामध्ये तब्बल २,०१७ सामने खेळविणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:20 AM2018-07-19T03:20:18+5:302018-07-19T03:20:42+5:30

whatsapp join usJoin us
Two thousand matches to be played this season - BCCI | यंदाच्या मोसमात खेळविणार दोन हजार सामने - बीसीसीआय

यंदाच्या मोसमात खेळविणार दोन हजार सामने - बीसीसीआय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्वेच्या राज्यांचा समावेश झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या आगामी देशांतर्गत मोसमामध्ये तब्बल २,०१७ सामने खेळविणार आहे. मात्र, यासाठी पंच, तसेच साहित्य व उपकरणांचीही कमतरता भासत असल्याने, बीसीसीआयला अनेक अडचणी पार कराव्या लागणार आहेत.
यंदाच्या सत्रापासून भारताच्या देशांतर्गत मोसमात मणिपूर, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहार संघांचा समावेश झाला आहे. यानंतर, वरिष्ठ पुरुष आणि महिला स्तरापासून १६ वर्षांखालील (मुले-मुली) स्तरापर्यंतच्या स्पर्धांतील सामन्यांची संख्याही वाढली आहे. १३ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेपासून देशांतर्गत मोसमाला सुरुवात होईल.
पुरुष खेळाडूंच्या मोसमाला १७ आॅगस्टपासून सुरू होणाºया दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरुवात होईल. यानंतर, १९ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर दरम्यान विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा रंगेल. या स्पर्धेदरम्यान १६० सामने खेळविण्यात येतील.
सय्यद मुश्ताक अली या राष्ट्रीय टी२० स्पर्धेत १४० सामने रंगले. १ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी दरम्यान सर्वात प्रतिष्ठेची रणजी चषक स्पर्धा पार पडेल. यंदा विक्रमी ३७ संघांचा या स्पर्धेत असेल. तसेच एकूण १६० सामन्यांचा खेळ रंगेल. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने माहिती दिली की, ‘यंदाचे सत्र साहित्य आणि उपकरणांच्या कमतरतेमुळे वाईट स्वप्नासारखे आहे. पंच आणि सामनाधिकारी यांच्याकडून आम्हाला अतिरिक्त काम करून घ्यावे लागेल. त्यांना प्रत्येक दौºयानंतर पुढील दौºयासाठी सज्ज होण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. या सर्व अधिकाºयांना सातत्याने प्रवास करावा लागेल.’ त्याचप्रमाणे, पूर्वेकडील राज्यांमधील मैदानांची कमतरता हीदेखील अडचण आहे. याविषयी पूर्वेकडच्या एका राज्याच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘शिलाँगमध्ये मेघालयचे मैदान व दिमापूर (नागालँड) येथील एक प्रथम श्रेणीचे मैदान सोडले, तर अन्य राज्य सुधार प्रक्रियेतून जात आहेत. त्याचबरोबर, आम्हाला येथील वातावरण आणि कमी प्रकाशमानाचाही विचार करावा लागेल.’

Web Title: Two thousand matches to be played this season - BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.