बीसीसीआयकडे युवराजचे ३ कोटी थकीत, मानधनासाठी सीओएकडे धाव घेण्याची तयारी

आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धदेखील संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग दोन्ही आघाड्यांवर लढा देत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:55 AM2017-10-18T00:55:57+5:302017-10-18T00:56:18+5:30

whatsapp join usJoin us
 Twenty-three crore of Yuvraj's tiredness to the BCCI, ready to take a run for the COA for honor | बीसीसीआयकडे युवराजचे ३ कोटी थकीत, मानधनासाठी सीओएकडे धाव घेण्याची तयारी

बीसीसीआयकडे युवराजचे ३ कोटी थकीत, मानधनासाठी सीओएकडे धाव घेण्याची तयारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धदेखील संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग दोन्ही आघाड्यांवर लढा देत आहे. संघात पुनरागमनाची धडपड सुरू असतानाच बीसीसीआयकडून मानधन कसे वसूल करायचे, याची त्याला चिंता भेडसावते आहे. युवराजला बोर्डाकडून तीन कोटी रुपये घ्यायचे आहेत.
मधल्या फळीचा आधारस्तंभ मानला जाणारा युवी दुखापती आणि खराब कामगिरीमुळे संघाबाहेर आहे. युवराजची आई शबनमसिंग यांनीही मुलाचे पैसे मिळविण्यासाठी बीसीसीआयच्या अनेक अधिकाºयांशी संपर्क साधला, पण अद्याप पैसे मिळाले नाहीत. २०१६ च्या टी-२० पासूनचे हे मानधन आहे. यंदा जुलैपासून दुखापतीमुळे सातत्याने तो संघाबाहेर आहे. राष्टÑीय संघात असताना एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला तरी बीसीसीआय त्या खेळाडूला मानधनाची भरपाई करते. याच नियमानुसार युवीने बीसीसीआयशी संपर्क केला, पण बीसीसीआयकडून प्रतिसाद थंड आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार आशिष नेहराला दुखापतीमुळे मुकाव्या लागलेल्या सामन्यांचे मानधन बीसीसीआयने त्वरित दिले. पण युवराज मात्र याच मानधनासाठी अद्याप ‘वेटिंग’वर आहे.
बीसीसीआयला आर्थिक निर्णय घेण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीची (सीओए) मान्यता मिळवावी लागते. युवी आपल्या थकीत मानधनासाठी याच समितीची भेट घेणार आहे. कैफियत मांडल्यानंतर किमान युवराजला न्याय मिळेल, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. (वृत्तसंस्था)

भारताच्या वेस्ट इंडिज दौ-यानंतर बीसीसीआयने संघातील प्रत्येक खेळाडूसाठी फिटनेस चाचणी अनिवार्य केली. युवराज फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला नव्हता. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळेच यंदाच्या आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामनेदेखील तो खेळू शकला नव्हता.

Web Title:  Twenty-three crore of Yuvraj's tiredness to the BCCI, ready to take a run for the COA for honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.