अ‍ॅशेस तिसरी कसोटी: स्मिथने आॅस्ट्रेलियाला सावरले, इंग्लंड पहिला डाव ४०३, आॅस्ट्रेलिया तीन बाद २०३ धावा

तिस-या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडने वर्चस्वाची संधी गमावली. पहिल्या डावांत ४०३ धावा केल्यानंतर या संघाने आॅस्ट्रेलियाचे तीन फलंदाज झटपट बाद केले होते. तथापि कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दुस-या दिवशी डाव सावरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:35 PM2017-12-15T23:35:35+5:302017-12-15T23:36:53+5:30

whatsapp join usJoin us
In the third Ashes Test, Smith scored Australia's first innings of 403, Australia made 203 for three | अ‍ॅशेस तिसरी कसोटी: स्मिथने आॅस्ट्रेलियाला सावरले, इंग्लंड पहिला डाव ४०३, आॅस्ट्रेलिया तीन बाद २०३ धावा

अ‍ॅशेस तिसरी कसोटी: स्मिथने आॅस्ट्रेलियाला सावरले, इंग्लंड पहिला डाव ४०३, आॅस्ट्रेलिया तीन बाद २०३ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : तिस-या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडने वर्चस्वाची संधी गमावली. पहिल्या डावांत ४०३ धावा केल्यानंतर या संघाने आॅस्ट्रेलियाचे तीन फलंदाज झटपट बाद केले होते. तथापि कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दुस-या दिवशी डाव सावरला.
इंग्लंडने जॉनी बेयरेस्टॉ आणि डेव्हिड मलानच्या विक्रमी द्विशतकी भागीदारीच्या बळावर मोठी धावसंख्या उभारली. मलानने १४० आणि बेयरेस्टॉने ११९ धावा केल्या. दोघांनी २३७ धावा ठोकून सर्वांत मोठ्या अ‍ॅश्ोस भागीदारीचा विक्रम मोडला.
प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाने दिवस अखेर ३ बाद २०३ अशी वाटचाल केली. स्मिथ १२२ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह ९२ आणि शॉन मार्श सात धावांवर नाबाद आहेत. यजमान संघ अद्याप २०० धावांनी मागे असून त्यांचे सात फलंदाज खेळायचे आहेत.
दुस-या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही क्षण आधी इंग्लंडने मार्शला बाद करण्याची संधी गमावली. शॉर्टलेगवर मार्क स्टोनमॅन हा झेल घेऊ शकला नाही.
त्याआधी,एक वेळ ४ बाद ३६८ अशा भक्कम स्थितीत असलेल्या इंग्लंडने अखेरचे सहा फलंदाज ३५ धावांत गमविले. दुसरा सामना खेळणारा ख्रिस ओव्हरटन याने आॅस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्नर(२२) आणि कॅमरुन बेनक्रॉॅफ्ट(२५) यांना बाद करीत आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. पण स्मिथने एक टोक सांभाळून इंग्लंडच्या आशेवर पाणी फेरले. स्मिथ- उस्मान ख्वाजा यांनी तिस-या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली. ख्वाजा ५० धावा काढून व्होक्सच्या चेंडूवर पायचित झाला.
आॅस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. या सामन्यात अखेरच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In the third Ashes Test, Smith scored Australia's first innings of 403, Australia made 203 for three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.