कोहली आणि माझ्यात काहीच फरक नाही

‘विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमक स्वभावाचे आहोत. त्यामुळे काहीच अडचण येत नाही. विशेष म्हणजे आम्ही दोघेही आव्हान स्वीकारण्यास कायम सज्ज असतो. आमच्यामध्ये काहीच फरक नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:25 AM2018-04-12T03:25:36+5:302018-04-12T03:25:36+5:30

whatsapp join usJoin us
There is no difference between Kohli and me | कोहली आणि माझ्यात काहीच फरक नाही

कोहली आणि माझ्यात काहीच फरक नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमक स्वभावाचे आहोत. त्यामुळे काहीच अडचण येत नाही. विशेष म्हणजे आम्ही दोघेही आव्हान स्वीकारण्यास कायम सज्ज असतो. आमच्यामध्ये काहीच फरक नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. शास्त्री यांना मंगळवारी रात्री ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात ‘महाराष्ट्राचा अभिमान’ असा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी शास्त्री यांची विशेष मुलाखत घेऊन कार्यक्रमात रंग भरले. या वेळी शास्त्री यांनी म्हटले की, ‘मी जसा आक्रमक आहे, तसाच कोहलीही आहे. यामुळे संघाच्या योजना आखताना किंवा मार्गदर्शन करताना अडचणी येत नाहीत. ठरलेल्या योजनांचा विराट मैदानात योग्यरीत्या अवलंब करतो.’
क्रिकेटमध्ये होणाऱ्या स्लेजिंगची काहीच अडचण नसल्याचे सांगताना शास्त्री म्हणाले की, ‘मला स्लेजिंगविषयी काही वाटत नाही. मी माझ्या खेळाडूंना सांगितले आहे, तुम्हाला कोणी एका गोष्टीनेही डिवचले, तर तुम्ही तीन गोष्टींनी प्रत्युत्तर द्या. समोरच्या व्यक्तीला
शांत करणे तुम्हाला आले पाहिजे.
पण हे करीत असताना मार्ग योग्य असला पाहिजे.’
महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्या संबंधांविषयी शास्त्री यांनी म्हटले की, ‘एम. एस. धोनी महान आहे. त्याच्या चेहºयावर कधीच कोणता ताण किंवा हावभाव दिसत नाही. तो शून्यावर बाद होऊ दे, शतक ठोकू दे, विश्वचषक जिंकू दे, दुसरी कोणती स्पर्धा जिंकू दे किंवा अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकू दे... तो कायम शांत असतो. धोनी आणि कोहली दोघांनाही एकमेकांचा कमालीचा आदर आहे. काही वेळा प्रसारमाध्यमांमध्ये दोघांविषयी वृत्त येते; मात्र त्यात तथ्य नसते. कोहली नेहमी धोनीकडून सल्ले घेतो. संघाच्या दृष्टीने या दोघांमधील ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे. आम्ही नेहमी एक संघ म्हणून पुढे जातो.’
>हा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मी मुंबई आणि अलिबागमध्ये राहतो, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने म्हणू शकता की मी महाराष्ट्राचा आहे. हा पुरस्कार स्वीकारणे एक अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड झाली यासाठी मी ज्युरी आणि ‘लोकमत परिवारा’चे आभार मानतो.- रवी शास्त्री
>विश्वचषक
सर्वोत्तम क्षण...
मुलाखतीदरम्यान शास्त्री यांना, समालोचक म्हणून कोणता क्षण आठवणीत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शास्त्री म्हणाले, ‘एक म्हणजे सहा षटकार.. जेव्हा मी सहा षटकार ठोकले तेव्हा टीव्ही नव्हते; पण युवराज सिंगने सहा षटकार मारले तेव्हा माझ्या हातात माइक होता आणि तो एक क्षण विसरू शकत नाही. पण सर्वोत्तम क्षण म्हणजे २०११चा विश्वचषक अंतिम सामना. मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि सिक्स मोअर, धोनी गोस बिग, इंडिया विन्स द वर्ल्डकप आफ्टर २८ इयर्स...’ शास्त्री यांच्या या दमदार प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा विश्वचषक विजयाच्या आठवणींना उजाळा मिळाला.

Web Title: There is no difference between Kohli and me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.