ठळक मुद्देटेस्ट चॅम्पिअनशिप आणि वन डे इंटरनॅशनल लीगला आयसीसीचा हिरवा कंदीलआज पार पडलेल्या बैठकीत नऊ संघाच्या टेस्ट लीग आणि 13 संघांच्या वन डे लीगला मान्यता2019 वर्ल्ड कपनंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल

ऑकलंड - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला असून आज झालेल्या बैठकीत टेस्ट चॅम्पिअनशिप आणि वन डे इंटरनॅशनल लीगला हिरवा झेंडा दाखवला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी आयसीसी नियामक मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून यासंबंधी चर्चा सुरु होता. आज झालेल्या बैठकीनंतर अखेर आयसीसीने यासंबंधी निर्णय घेऊन टाकला.

आयसीसीच्या या नव्या निर्णयानंतर वन डे प्रमाणे कसोटीतही चॅम्पिअनशिप खेळली जाणार आहे. कसोटी चॅम्पिअनशिपसाठी एकूण नऊ संघ सहभागी असतील. क्रमवारीतील पहिले नऊ संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पात्र असतील. प्रत्येक संघ एकूण सहा कसोटी मालिका खेळतील. सहा मालिकांपैकी तीन मालिका घरच्या मैदानावर, तर उर्वरित सहा मालिका प्रतिस्पर्धी देशात होतील. 2019 वर्ल्ड कपनंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल.  प्रत्येक संघाला किमान दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते. झिम्बाम्ब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी चॅम्पिअनशिपमधून वगळण्यात आलं आहे.दुसरीकडे वन डे लीगमध्ये सहभागी होणारे संघ येथूनच थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करतील. वन-डे लीगमध्ये एकूण 13 संघ सहभागी असतील. 2020 पासून वन डे लीगची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. या लीगमध्ये प्रत्येक संघाला 8 मालिका खेळाव्या लागतील. यापैकी चार मायदेशात, तर उर्वरित चार प्रतिस्पर्धी देशात होतील. एका मालिकेत जास्तीत जास्त तीन वन डे सामने खेळवण्याची अट असेल.


आज पार पडलेल्या बैठकीत नऊ संघाच्या टेस्ट लीग आणि 13 संघांच्या वन डे लीगला मान्यता देण्यात आली आहे. द्विपक्षीय मालिकेला अधिक महत्व प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने आयसीसीने हा निर्ण घेतला आहे. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी आयसीसीचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'द्विपक्षीय मालिकेला अधिक महत्व देणं इतकं काही मोठं आव्हान नव्हतं. पण पहिल्यांदाच यावर योग्य पर्याय सापडला आहे'. 

कसोटी आणि वन डे लीगमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या देशात जाऊनही सामने खेळावे लागणार आहेत. पाकिस्तानने मात्र भारतात येऊन खेळण्यासाठी नकार दिला असल्याची माहिती आहे. यानंतर आसीसीने पर्याय शोधण्याचं आश्वासन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिलं आहे. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.