पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड

सर्वोत्कृष्ट संघ कोणता, हे ठरविण्यात मला किंचितही रुची नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:12 AM2018-09-22T05:12:33+5:302018-09-22T05:12:49+5:30

whatsapp join usJoin us
Team India will make a lesson from defeat: Rahul Dravid | पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड

पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट संघ कोणता, हे ठरविण्यात मला किंचितही रुची नाही. या वादात अडकण्यापेक्षा इंग्लंडमध्ये झालेल्या पराभवापासून बोध घ्यायला हवा. झालेल्या चुका टाळून कसे पुढे जायचे हे महत्त्वपूर्ण असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांआधी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला आतापर्यंतचा ‘सर्वोत्कृष्ट संघ’ असे संबोधले होते. शास्त्री यांच्या वक्तव्यावर द्रविडला काय वाटते, हे जाणून घेतले असता तो म्हणाला,‘शास्त्री काय विचार करतात यावर टिप्पणी करणे माझे काम नाही. माझ्यामते त्यांचे वक्तव्य खरमरीतपणे प्रकाशित करण्यात आले. भारत इंग्लंडमध्ये १-४ ने का पराभूत झाला याची कारणे शोधणे आवश्यक आहे. पुढच्यावेळी इंग्लंड दौरा करू तेव्हा अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल.’
शास्त्री यांच्या वक्तव्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यासह अनेक माजी दिग्गजांनी कठोर टीका केली होती. भारताने याआधी २००७ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची मालिका जिंकली तेव्हा द्रविड कर्णधार होता.
भारतीय संघ गोलंदाजीत उत्तम होता, असे सांगून काही वेळा संधीचा लाभ घेण्यात अपयश आल्यामुळेच इंग्लंडमध्ये पराभव झाल्याचे द्रविडचे मत आहे. तो म्हणाला,‘आम्हाला तीन-चार वर्षांत एकदा इंग्लंड दौºयाची संधी मिळते. त्यामुळे पुढील चार वर्षांत काय घडेल, याची शाश्वती नसते. यंदा आमचा संघ खरोखर चांगलाच होता. गोलंदाजी माराही भेदक होता. विजयाची संधी आमच्याकडेही होती. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण झेल आदी क्षेत्रात खेळाडू सरस ठरले. पण मोक्याच्याक्षणी धावा काढण्यात अपयश आल्याने नुकसान सोसावे लागले.’
इंग्लंडमधील परिस्थिती फलंदाजीस अनुकूल नसतेच असे स्पष्ट करीत द्रविड पुढे म्हणाला,‘मी स्वत: तेथे वारंवार खेळलो आहे. परिस्थितीश्ी एकरूप होणारे फलंदाजच खेळपट्टीवर स्थिरावू शकतात.’ द्रविडने सध्याच्या आशिया चषकात पाकिस्तान संघावर अधिक लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अन्य संघाच्या कामगिरीचे निरीक्षण करण्याचा टीम इंडियाला सल्ला दिला. अफगाणिस्तान आणि बांगला देश यांच्यापासून सावध राहण्यास सांगितले. (वृत्तसंस्था)
>राजकारणात मुळीच रुची नसून २०१९ ची सार्वत्रिक निवडणक लढविण्याचाही इरादा नसल्याचे ‘द वॉल’ राहुल द्रविड याने स्पष्ट केले. पुढीलवर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून कुठल्या पक्षाने विचारणा केली का, या प्रश्नाच्या उत्तरात राहुल खदखदून हसला. गमतीने तो म्हणाला, ‘मला कोण संपर्क करणार? माझी राजकारणात रुची नाहीच. मी क्रिकेटमध्ये रंगलो आहे.’

Web Title: Team India will make a lesson from defeat: Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.