नव्या ‘एफटीपी’मध्ये टी-२० महत्त्वपूर्ण; पाच वर्षात मायदेशात ८१ आंतरराष्ट्रीय सामने होतील

एफटीपीमध्ये (प्रस्तावित भविष्य दौरा कार्यक्रम) द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना पुरेसे महत्त्व देण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:57 AM2017-12-16T04:57:01+5:302017-12-16T04:57:09+5:30

whatsapp join usJoin us
T20 is important in new 'FTP'; There will be 81 international matches in five years | नव्या ‘एफटीपी’मध्ये टी-२० महत्त्वपूर्ण; पाच वर्षात मायदेशात ८१ आंतरराष्ट्रीय सामने होतील

नव्या ‘एफटीपी’मध्ये टी-२० महत्त्वपूर्ण; पाच वर्षात मायदेशात ८१ आंतरराष्ट्रीय सामने होतील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : एफटीपीमध्ये (प्रस्तावित भविष्य दौरा कार्यक्रम) द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना पुरेसे महत्त्व देण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी दिली.
जोहरी यांनी प्रस्तावित एफटीपी सादर केला आणि त्यात पाच वर्षांत मायदेशात ८१ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्या जाणार आहेत व त्यात २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे.
भारत या कालावधीत ५३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून त्यात विदेशात खेळल्या जाणाºया २६ सामन्यांचा समावेश आहे.
जोहरी म्हणाले,‘आम्ही प्रत्येकासोबत चर्चा केली आणि आम्हाला फिडबॅक मिळाला की, केवळ एकमेव टी-२० सामन्याला काही अर्थ नाही. जर लढत होणार असेल तर त्याला काही अर्थ असायला हवा. त्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना सार्थकता प्रदान करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.’
आमच्या कार्यकारिणीने नव्या एफटीपीवर अनेक महिने काम केले आता केवळ आयसीसीची मंजुरी मिळणे शिल्लक आहे, असेही त्यानी सांगितले.
भारताचा मायदेशातील सामन्यांचा प्रसारण अधिकार करार मार्च २०१८ मध्ये होणार असून आयपीएलप्रमाणे यावेळीही मोठ्या रकमेचा करार होईल, असा जोहरी यांना विश्वास आहे. स्टार इंडियाने आयपीएलचे प्रसारण अधिकार १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले.
जोहरी म्हणाले,‘आम्ही समतोल एफटीपी सादर केला आहे. त्यात संभाव्य प्रसारकांना आकर्षित करण्यात मदत मिळले. आयपीएल मीडिया अधिकार पटकाविण्यासाठी ज्याप्रमाणे उत्सुकता दिसून आली त्याचप्रमाणे यावेळीही दिसून येईल, अशी आशा आहे. आम्ही प्रसारण अधिकारांचा विचार करून एफटीपी तयार केला आहे. प्रस्तावित एफटीपीमध्ये भारत ३७ कसोटी सामने खेळणार असून त्यात १९ देशात तर १८ विदेशात होणार आहे.’
जोहरी पुढे म्हणाले,‘कसोटी क्रिकेटप्रती बीसीसीआय कटिबद्ध आहे. भविष्यातही हीच भूमिका
कायम राहील. आमचे जवळजवळ
५० टक्के सामने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया या संघांसोबत होणार आहे. आम्ही प्रत्येक संघांसोबत खेळणार आहोत. आम्ही तयार केलेल्या एफटीपीनुसार मायदेशात व विदेशात पुरेशे सामने खेळणार असल्याचे निश्चित आहे.’ (वृत्तसंस्था)

योग्य तोडगा काढला आहे...
आयपीएलदरम्यान कुठल्याही संघाने आंतरराष्ट्रीय सामना खेळू नये, असे बीसीसीआयला वाटते. असा नियम न करता ही परंपरा व्हावी, असे बीसीसीआयचे मत आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट (ईसीबी) बोर्ड यासाठी लवकरच तयार होईल, असा जोहरी यांना विश्वास आहे. ईसीबीतर्फे आयपीएलदरम्यान मालिकेचे आयोजन होत असते.
जोहरी म्हणाले,‘उत्तर व दक्षिण गोलार्धामध्ये क्रिकेट कॅलेंडर वेगळे असते. दक्षिण गोलार्धातील देश जवळजवळ एकाचवेळी क्रिकेट खेळतात तर उत्तर गोलार्धातील देशांचे कॅलेंडर वेगळे असते. कॅलेंडर डिस्टर्ब न करता मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न उपस्थित होतो. पण, आम्ही त्यात योग्य तोडगा शोधला आहे. ईसीबीसोबत चर्चा सुरू आहे.’
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी दिवस-रात्र सामने कसोटी क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगले असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना जोहरी म्हणाले,‘ माझे काम केवळ भागधारकांना सर्वोत्तम मूल्य उपलब्ध करून देण्याचे आहे. हा बीसीसीआयसोबत जुळलेला निर्णय असून कार्यकारिणीच्या अधिकारात येतो. ते निर्देश देतील त्यानुसार आम्ही कार्य करू.’

Web Title: T20 is important in new 'FTP'; There will be 81 international matches in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.