टी-२० मुंबई लीग क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी

फ्रेंचाइजींवर आधारित टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:22 AM2018-03-14T04:22:40+5:302018-03-14T04:22:40+5:30

whatsapp join usJoin us
T-20 Mumbai League cricket fan party | टी-२० मुंबई लीग क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी

टी-२० मुंबई लीग क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- दिलीप वेंगसरकर लिहितात...
फ्रेंचाइजींवर आधारित टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. काही आठवड्यांमध्ये सुरू होणाºया आयपीएलआधी टी-२० मुंबई लीग क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच ठरत आहे.
बुधवारी होणाºया सामन्यात ट्रिम्प नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघ आणि आर्क्स अंधेरी संघ एकमेकांविरुद्ध लढतील. या सामन्याच्या निकालानंतर ही लीग रोमांचक स्थितीमध्ये पोहोचेल. या लीगच्या पहिल्याच दिवशी ट्रिम्प नाइटने सोबो सुपरसॉनिक संघाला आणि आर्क्स अंधेरीने नॉर्थ मुंबई पँथर्स संघाला नमवल्यानंतर मुंबईच्या खºया क्रिकेट थराराला सुरुवात झाली. पण असे असले तरी माझ्या मते मुंबईत अशा प्रकारच्या लीगचे उशिराने आयोजन झाले.
क्रिकेटमध्ये तुम्ही केवळ अनुभवातून शिकता आणि जे खेळाडू हे अनुभव आत्मसात करतात त्यांच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होते. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर आणि यांसारखे इतर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळत असल्याचा मला आनंद आहे. कारण या सर्व खेळाडूंच्या उपस्थितीचा आणि त्यांच्या अनुभवाचा नवोदितांना मोठा फायदा होईल. अनेक वर्षांपासून मुंबई देशांतर्गत क्रिकेटमधील अव्वल संघांपैकी एक ठरला आहे. भारतीय संघातून खेळलेले अनेक कसोटीपटू सातत्याने स्थानिक स्पर्धेत खेळत राहिल्याने युवा खेळाडूंना त्यांचा अनुभवातून लगेच शिकता येत होते आणि यामुळेच मुंबई क्रिकेट भक्कम झाले. त्यामुळेच मुंबईकर युवा खेळाडू अल्पावधीत क्रिकेटचे तंत्र शिकतात.
आर्क्स अंधेरीच्या शुभम रांजणे आणि पराग खानापूरकर यांची आक्रमक अर्धशतक खेळी एक मेजवानीच ठरली. या दोघांच्या जोरावर अंधेरीने १६४ धावांची मजल मारली. त्याचवेळी, स्टार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाºया नॉर्थ
मुंबई पँथर संघाला केवळ
१४१ धावांची मजल मारला आली. दुसरा सामनाही चमकदार झाला. आकाश पारकरने ३७ चेंडूत ८२ धावांचा नाबाद तडाखा दिल्याने मुंबई नॉर्थ इस्ट संघाने सोबो सुपरसॉनिक्सचा सहज पराभव केला.
ही लीग युवा खेळांसाठी संधी असली तरी निवडकर्त्यांची नजर कसोटी सामन्यातील कामगिरीवर असेल. येथे गेल्या दशकभरापासून आयपीएलद्वारे टी-२० ने जम बसवला असून या स्पर्धेने तुफान यश मिळवले आहे. टी-२० मुंबई लीगमध्ये सुमारे १००हून अधिक स्थानिक खेळाडूंचा सहभाग आहे. जसजसी लीग पुढे जाईल या स्पर्धेतील चुरशीचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी स्टेडियमवर होईल, अशी मला अपेक्षा आहे. (पीएमजी)

Web Title: T-20 Mumbai League cricket fan party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.