टी-१० क्रिकेट लीग : पख्तून्सचा ६ गड्यांनी विजय, लियाम डॉवसन सामनावीर

ऐतिहासिक शारजा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-१० क्रिकेट लीगच्या स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पख्तून्स संघाने बंगाल टायगर्सचा ६ गड्यांनी पराभव केला. प्लेआॅफमधील या सामन्यात बंगाल टायगर्सने २ बाद १२६ धावा केल्या होत्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:37 AM2017-12-17T01:37:15+5:302017-12-17T01:37:21+5:30

whatsapp join usJoin us
T-10 Cricket League: Vijay, Liam Dawson, Man of the Match, by 6 wickets | टी-१० क्रिकेट लीग : पख्तून्सचा ६ गड्यांनी विजय, लियाम डॉवसन सामनावीर

टी-१० क्रिकेट लीग : पख्तून्सचा ६ गड्यांनी विजय, लियाम डॉवसन सामनावीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा : ऐतिहासिक शारजा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-१० क्रिकेट लीगच्या स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पख्तून्स संघाने बंगाल टायगर्सचा ६ गड्यांनी पराभव केला. प्लेआॅफमधील या सामन्यात बंगाल टायगर्सने २ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पख्तून्स संघाने विजयी लक्ष्य
अखेरच्या षटकात गाठले. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पख्तून्सने बाजी मारली. अष्टपैलू कामगिरी करणारा डॉवसन हा सामनावीर ठरला.
पराभूत झाल्यानंतर निराश झालेला बंगालचा कर्णधार सर्फराज याने यष्ट्या विखुरल्या. त्याआधी, पख्तून्सचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगाल टायगर्सच्या जे. चार्ल्सने १२ चेंडंूत २८, ड्वेन ब्राव्होने १४ चेंडूंत नाबाद १९ आणि डेव्हिड मिलर याने सर्वाधिक नाबाद ६८ धावा केल्या. त्याने २६ चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. पख्तून्स संघाकडून कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि डॉवसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात, अहमद शहजादने १७ चेंडूंत ३८ (५ चौकार, २ षटकार) शानदार फलंदाजी केली. शाहीद आफ्रिदीने २३, फखर झमानने ११ चेंडूंत ३१ धावांची खेळी केली. ड्वेन स्मिथ (९) आणि डॉवसन (१६) हे नाबाद राहिले. बंगालकडून एम. लांगे, मोहम्मद नवीद, अन्वर अली आणि झहीर खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Web Title: T-10 Cricket League: Vijay, Liam Dawson, Man of the Match, by 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.