india vs england : तीन कसोटी होईपर्यंत पत्नींपासून दूर राहा, भारतीय क्रिकेपटूंना आदेश

टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडच्या विविध ठिकाणांना भेट देत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:15 PM2018-07-23T14:15:48+5:302018-07-23T14:16:15+5:30

whatsapp join usJoin us
Stay away from Wife until three tests, order to Indian cricketer | india vs england : तीन कसोटी होईपर्यंत पत्नींपासून दूर राहा, भारतीय क्रिकेपटूंना आदेश

india vs england : तीन कसोटी होईपर्यंत पत्नींपासून दूर राहा, भारतीय क्रिकेपटूंना आदेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघ 25 ते 28 जुलै या कालावधीत एसेक्स संघाविरूद्ध शेल्मफोर्ड येथे सराव सामना खेळणार आहे.

लंडन - टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडच्या विविध ठिकाणांना भेट देत आहेत. त्यातील बरेच जण आपापल्या पत्नीसोबत पर्यटन करत आहेत आणि सोशल मीडियावर सेल्फी शेअर करत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना पत्नी व प्रेयसी पासून दूर राहण्याचे आदेश संघ व्यवस्थापनाने दिल्याचे वृत्त समोर येत आहे. 
कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघाला तयारीसाठी चार दिवसांचा कालावधी मिळत आहे. खेळाडू आपापल्या पत्नी, मित्र आणि नातेवाईकांसोबत पर्यटन करत आहेत. पहिल्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ सोमवारी  शेल्मफोर्डसाठी रवाना झाला आहे. मागील काही मालिकांतील अपयशामुळे खेळाडूंच्या कुटुंबीयांवर भरपूर टीका झाली होती. भारत-इंग्लंड मालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही, तर त्याचे खापर पुन्हा खेळाडूंच्या कुटुंबीयांवर फोडले जाऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापनाने खेळाडूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले आहे. 
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघ 25 ते 28 जुलै या कालावधीत एसेक्स संघाविरूद्ध शेल्मफोर्ड येथे सराव सामना खेळणार आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांतील निकालानंतर खेळाडूंच्या पत्नी व गर्लफ्रेंड यांच्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

Web Title: Stay away from Wife until three tests, order to Indian cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.