बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी मिळणार ६० कोटी

भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारणाचे हक्क स्टार  इंडियाने तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांना विकत घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 05:12 PM2018-04-05T17:12:36+5:302018-04-05T17:12:36+5:30

whatsapp join usJoin us
StarIndia bags BCCI Media rights for Rs 6138.1 crore, average of Rs 60.1 crore per game | बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी मिळणार ६० कोटी

बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी मिळणार ६० कोटी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारणाचे हक्क स्टार  इंडियाने तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या इ- लिलावात आज स्टारने सोनी आणि जिओ या दोन दिग्गज कंपन्यांना मागे टाकत हे हक्क मिळवले. हे हक्क २०१८-२०२३ या ५ वर्षांसाठी असून २०१२-२०१८ या ५ वर्षांसाठी मिळालेल्या रकमेच्या तब्बल ५१.३९% हा रक्कम जास्त आहे.

वैश्विक समग्र अधिकार ज्यात भारत व बाहेरील प्रसारणासोबतच डिजीटल अधिकारही सामील आहेत. गेल्या वेळी २०१२मध्ये प्रसारण हक्क ३ हजार ८५२१ कोटी रुपयांत विकले गेले होते. दुस-या दिवशी बीसीसीआयचे प्रसारण हक्कात ५६ टक्के वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक सामना जवळपास ६० कोटी रुपयांत गेला आहे. भारताला पुढच्या पाच वर्षांत तिन्ही प्रारुपात १०२ सामने खेळायचे आहेत.

Web Title: StarIndia bags BCCI Media rights for Rs 6138.1 crore, average of Rs 60.1 crore per game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.