नवी दिल्ली : पुढील वर्षी होणा-या दक्षिण आफ्रिका दौ-यात चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वाची ठरेल, अशी आशा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौ-यासाठी तयारी करण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे पुजाराला वाटते. पुजारा म्हणाला, ‘पुढील वर्षी होणा-या दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत सर्वच विचार करीत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी तयारी करण्याची चांगली संधी राहील. मला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.’ दक्षिण आफ्रिका दौ-यातील पहिला कसोटी सामना ६ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. या दौ-यासाठी तयारीला सुरुवात झाली का,
याबाबत बोलताना पुजारा म्हणाला, ‘तयारी मालिकेच्या सुरुवातीला प्रारंभ होते. पण माझ्या मते,
एकदा श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सर्व खेळाडू एकत्र येतील, त्या वेळी दक्षिण आफ्रिका दौºयाबाबत काही चर्चा होईलच.’ काही महिन्यांपूर्वी पुजाराने श्रीलंकेविरुद्ध गाले व कोलंबो येथे पहिल्या दोन कसोटी सामन्यांत १५३ व १३३ धावांच्या खेळी
केल्या होत्या. 

दक्षिण आफ्रिकेच्या उसळी घेणाºया खेळपट्ट्यांसाठी काही विशेष सराव सुरू केला आहे, याबाबत बोलताना पुजारा म्हणाला, ‘प्रत्येक मालिकेप्रमाणे या मालिकेसाठीही गृहपाठ करणार आहे. मालिकेपूर्वी नेट््समध्ये काही विभागावर मेहनत घ्यावी लागेल. त्याबाबत खुलासा करता येणार नाही, कारण तो रणनीतीचा भाग आहे.’