स्मिथ व वॉर्नर भारतीयांच्या रागपासून बचावतील - इयान चॅपेल

चेंडू छेडखानी प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांच्या रागापासून बचाव करता येईल, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:19 AM2018-04-02T02:19:04+5:302018-04-02T02:19:04+5:30

whatsapp join usJoin us
 Smith and Warnor to avoid the wrath of Indians - Ian Chappell | स्मिथ व वॉर्नर भारतीयांच्या रागपासून बचावतील - इयान चॅपेल

स्मिथ व वॉर्नर भारतीयांच्या रागपासून बचावतील - इयान चॅपेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - चेंडू छेडखानी प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांच्या रागापासून बचाव करता येईल, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने म्हटले आहे.
चॅपेल म्हणाले, ‘यामुळे या खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी त्यामुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही. कारण चेंडू छेडखानी वाद सध्या ताजा आहे. बीसीसीआय आपल्या अधिकारक्षेत्रात खराब वर्तनासाठी कठोर पाऊल उचलत असेल, तर ते स्वागतार्ह आहे.’
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीदरम्यान चेंडूसोबत छेडखानी केल्याच्या प्रकरणात सहभागी झाल्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्मिथ व वॉर्नर यांच्यावर प्रत्येक एक वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंवर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली. या प्रकरणात समावेश असलेल्या कॅमरुन बेनक्रॉफ्टवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने ९ महिन्यांची बंदी घातली आहे.
चॅपेल यांनी पुढे म्हटले आहे की,‘बीसीसीआयचे प्रशासन गेल्या काही वर्षांमध्ये प्रभावशाली नव्हते. या नव्या धोरणामुळे क्रिकेट प्रशासकांच्या पद्धतीमध्ये बदल होत असेल तर केपटाऊनमधील घटना पूर्णपणे काळा अध्याय मानली जाणार नाही.’

यामुळे खेळाची प्रतिमा मलिन...
‘सीए’ आणि आयसीसीच्या भूमिकेवर टीका करताना चॅपेल म्हणाले,‘ चेंडू छेडछाड प्रकरणासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलिया व आयसीसीही काही अंशी दोषी आहे. जागतिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या वर्तनाची पातळी घसरली आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. मैदानावर खेळाडूंच्या वर्तनावर अंकुश राखण्यात संघटना अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे खेळाची प्रतिमा मलिन झाली आहे.’

Web Title:  Smith and Warnor to avoid the wrath of Indians - Ian Chappell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.