कोहली आणि अनुष्का यांच्या ' त्या ' फोटोवर बीसीसीआयने सोडले मौन

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची यांचा एक फोटो सोशल मीडीयावर वायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोला जबरदस्त ट्रोल केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:56 PM2018-08-09T17:56:05+5:302018-08-09T17:57:32+5:30

whatsapp join usJoin us
Silence left by BCCI on photo of Virat Kohli and Anushka Sharma | कोहली आणि अनुष्का यांच्या ' त्या ' फोटोवर बीसीसीआयने सोडले मौन

कोहली आणि अनुष्का यांच्या ' त्या ' फोटोवर बीसीसीआयने सोडले मौन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबीसीसीआय आपली भूमिका कधी स्पष्ट करणार, याची उत्सुकता साऱ्यांना होती. पण बीसीसीआयने या प्रश्नाला बगल दिल्याचेच दिसत आहे.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची यांचा एक फोटो सोशल मीडीयावर वायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोला जबरदस्त ट्रोल केले होते. या फोटोवर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण अखेर बीसीसीआयने आपले मौन सोडले आहे.

काय आहे प्रकरण
इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली होती. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. बीसीसीआयने भारतीय दुतावासाला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नेटिझन्सकडून बीसीसीआयची कानउघडणी करण्यात आली होती. कारण या फोटोमध्ये अनुष्काला पहिल्या रांगेत उभे करण्यात आले होते. तर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चौथ्या रांगेत उभे केले होते.

 



 

बीसीसीआयने काय म्हटले
भारतीय दुतावासाने संघाला आपल्या कुटुंबियांसमवेत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला कुणाला न्यायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्यामुळे अनुष्का या कार्यक्रमाला गेल्यामुळे कुठलाही नियम मोडीत काढण्यात आलेला नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआय यावर गप्पा का
भारतीय दुतावासाला भेट दिल्यावर संघाचा एक फोटो काढण्यात आला. या फोटोमध्ये भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चौथ्या रांगेत मागे करण्यात आले होते. याबद्दल बीसीसीआय आपली भूमिका कधी स्पष्ट करणार, याची उत्सुकता साऱ्यांना होती. पण बीसीसीआयने या प्रश्नाला बगल दिल्याचेच दिसत आहे.

Web Title: Silence left by BCCI on photo of Virat Kohli and Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.