LIVE- भारताची फायनलकडे वाटचाल, 273 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा निम्म्याहून जास्त संघ तंबूत

शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर  19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत आज सुरू असलेल्या उपांत्य लढतीमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:45 AM2018-01-30T06:45:34+5:302018-01-30T09:00:24+5:30

whatsapp join usJoin us
Shubhaman Gil's unbeaten century, India's challenge for chasing 273 runs | LIVE- भारताची फायनलकडे वाटचाल, 273 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा निम्म्याहून जास्त संघ तंबूत

LIVE- भारताची फायनलकडे वाटचाल, 273 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा निम्म्याहून जास्त संघ तंबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ख्राईस्टचर्च -  शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर  19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत आज सुरू असलेल्या उपांत्य लढतीमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले आहे.   

08:43 AM- 19 वर्षांखालील विश्वचषक : पाकिस्तानला सातवा धक्का, हसन खान केवळ 1 धावावर बाद.

  • 08:39 AM- अंडर 19 विश्वचषक- भारत वि.पाकिस्तान. पाकिस्तानला सहावा धक्का. रोहेल नाझीर बाद.

  • 08:35 AM- अंडर 19 विश्वचषक- भारत वि.पाकिस्तान. पाकिस्तानला पाचवा धक्का. मोहम्मद ताहा बाद.

  • 08:20 AM- 19 वर्षांखालील विश्वचषक : पाकिस्तानला चौथा धक्का, अमाद आलम बाद.

  • 07:34 AM- 19 वर्षांखालील विश्वचषक : 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीला दोन धक्के

 

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत  9 बाद 272 धावा फटकावल्या.  शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांच्यातील दणदणीत सलामी भागीदारी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. 
पृथ्वी शॉ आणि कालरा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या शुभमनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. डावातील शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण करणाऱ्या गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. 
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्रीकारल्यावर कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कार्ला यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली . पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या जिवदानांचा पुरेपूर फायदा उठवत त्यांनी संघाला 89 धावांची सलामी दिली. यादरम्यान, पृथ्वी शॉ 41 धावांवर बाद झाला. तर मनज्योत कालरा 47 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिल याने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत भारताचा डाव सावरला.  

Web Title: Shubhaman Gil's unbeaten century, India's challenge for chasing 273 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.