आईस क्रिकेटमध्ये शोएब आणि सेहवाग आमने सामने

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 09:50 PM2017-11-23T21:50:14+5:302017-11-23T21:50:44+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib and Sehwag come together in Ice Cricket | आईस क्रिकेटमध्ये शोएब आणि सेहवाग आमने सामने

आईस क्रिकेटमध्ये शोएब आणि सेहवाग आमने सामने

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे. मात्र या वेळी हे खेळाडू क्रिकेटच्या मैदानाऐवजी आईस क्रिकेटमध्ये उतरतील.
सेहवाग आणि शोएब यांचा सामना स्वित्झर्लण्डच्या सेंट मॅरिट्झमध्ये बर्फात हा सामना होईल. सेंट मॅरिट्समध्ये १९८८ मध्ये हौशी क्रिकेट सामना घेण्यात आला. मात्र पहिल्यांदाच दोन महान खेळाडूंमध्ये हा सामना होणार आहे. पुढच्या वर्षी ८ आणि ९ फेबु्रवारीला हे क्रिकेट सामने होतील. त्यात मोहम्मद कैफ, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, मायकल हसी, ग्रीम स्मिथ, जॅक कॅलिस, डॅनियल व्हिट्टोरी, नॅथन मॅक्क्युलम, ग्रांट इलियट, मॉँटी पानेसर आणि ओवेस शाह हे खेळतील.

सेंट मेरीज् आईस क्रिकेटच्या लॉँचिंग सोहळ्यात सेहवाग उपस्थित होता. त्याने आणि कैफ याने खेळण्यास तत्काळ होकार दिला.
सेहवाग म्हणाला की,‘मी कधीच विचार केला नव्हता की, बर्फावर क्रिकेट खेळणे शक्य आहे. मात्र आता ते होत आहे. मी याचा अनुभव घेऊ इच्छितो. येथे खेळणे आव्हानात्मक असेल.’ कैफ म्हणाला की,‘युरोपात क्रिकेट लोकप्रिय नाही. मात्र याची सुरुवात करून आम्ही येथे प्रभाव टाकू शकू, बर्फावर खेळण्याचा विचार खूपच रोमांचक आहे.’

Web Title: Shoaib and Sehwag come together in Ice Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.