हार्दिकला कंपनी देण्यासाठी 'ती' पोहोचली दक्षिण आफ्रिकेत

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 10:44am

युवराज सिंग-हेझल किच, झहीर खान-सागरीका घाटगे, विराट कोहली-अनुष्का शर्मा क्रिकेट आणि बॉलिवूडच्या या लव्हस्टोरीजमध्ये  आणखी एका नव्या जोडीचा समावेश होणार आहे.

मुंबई - युवराज सिंग-हेझल किच, झहीर खान-सागरीका घाटगे, विराट कोहली-अनुष्का शर्मा क्रिकेट आणि बॉलिवूडच्या या लव्हस्टोरीजमध्ये  आणखी एका नव्या जोडीचा समावेश होणार आहे. क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू खेळाबरोबरच त्याच्या प्रेम प्रकरणांसाठीही चर्चेत असतो. हार्दिकचे नाव आता अभिनेत्री एली अवरामबरोबर जोडले जात असून दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. 

एली हार्दिकला कंपनी देण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर या चर्चेने जास्तच जोर पकडला आहे. अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीसोबत एली दक्षिण आफ्रिकेमध्ये भटकंती करत आहे. शिखर धवनची मुलगी रेहाच्या 13 व्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्येही ती सहभागी झाली होती. हार्दिक पांडयाचा भाऊ कुणा पांडयाच्या लग्नामध्ये सुद्धा एली दिसली होती. 

हार्दिक पांडयाचे नाव यापूर्वी सुद्धा अन्य अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. हार्दिकचे नाव अभिनेत्री परिणीती चोप्राबरोबर सुद्धा जोडले जात होते.                                                                 

                                                                            

संबंधित

चेन्नई एक्स्प्रेस सुसाट...
पिच फिक्सिंग स्टिंग : बीसीसीआयचा प्रतीक्षेचा निर्णय
आयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने
अंतिम सामना रोमांचक होईल
कर्णधारपदाचे महत्त्व सर्वांना कळले

क्रिकेट कडून आणखी

IPL 2018 Final, CSK vs SRH : वानखेडेवर तळपला वॉटसन, चेन्नई बनली चॅम्पियन
टॉसचा ड्रामा; धोनीनं मांजरेकरांना केलं कन्फ्युज, पाहा व्हिडीओ
हा योगायोग पाहिलात का? युसूफ पठाणची या दोन सामन्यांत निर्णायक खेळी
IPL 2018- ड्वेन ब्राव्होनं अंतिम फेरीत बनवला नवा रेकॉर्ड
मॅचचा निकाल काहीही लागो, जिंकणार विल्यम्सनच

आणखी वाचा