शंकराची 'समाधी'.... 'त्या' थरारक विजयानंतर विजयने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं!

त्या खेळीमुळं भारतीय क्रीडाप्रेमींच्या रागाचे कारण ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 03:37 PM2018-03-21T15:37:18+5:302018-03-21T15:47:33+5:30

whatsapp join usJoin us
Shankara's 'Samadhi' .... After that 'Thaarak' Vijay, Vijay closed himself in the room! | शंकराची 'समाधी'.... 'त्या' थरारक विजयानंतर विजयने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं!

शंकराची 'समाधी'.... 'त्या' थरारक विजयानंतर विजयने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली -  श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात दिनेश कार्तिकने मोक्याच्या क्षणी केलेल्या तुफीनी फलंदाजीच्या बळावर भारताने निदाहास चषकावर नाव कोरलं. कार्तिकने तुफान फटकेबाजी करत शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकला.  18 चेंडूत 35 धावांची गरज असताना विजय शंकरने चार चेंडू निर्धाव खेळून काढले आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या रागाचे कारण ठरला होता. त्यावेळी सर्वच क्रीडाप्रेमी त्याला मनोमन शिव्या देत होते. पण कार्तिकने मोक्याच्यावेळी 8 चेंडूत 29 धावा करत सामना जिंकून दिला. कार्तिकच्या या फटकेबाजीमुळं विजय शंकर व्हिलन होता होता वाचला. 

पण हा सामना विजय शंकरच्या कायम स्मरणात राहिल. नवख्या विजय शंकरने अंतिम सामन्यात 17 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. सामना झाल्यानंतर त्यानं स्वत:ला खोलीत बंद करुन ठेवलं होते.  सामन्यानंतर तो टीकाकारांच्या रोषाला बळी पडला. त्याचप्रमाणे त्याच्या मनातही बरेच प्रश्न उपस्थित राहिले होते. जर शेवटच्या चेंडूवर कार्तिकने षटकार मारला नसता तर.....हा विचार त्याच्या मनात घर करुन राहिला. रात्रभर तो त्याच गोष्टीचा विचार करत होता. त्यारात्री विजयनं स्वत:ला खोलीत बंद केलं होते. बंद खोलीत तो एकच विचार करत होता, मोक्याच्या क्षणी मी निर्धाव चेंडू खेळलो होतो. जर सामना भारताने गमावला असता तर काय झालं असतं? मी जर निर्धाव चेंडू खेळले नसते तर सामना सहज जिंकता आला असता. त्यानं बंद खोलीत स्वत:च्या खेळीचे आत्मपरीक्षण केलं. आपण कुठे चुकलो आणि काय करायला हवं होते.  भारताला सामना जिंकून देण्याचा आपण चांगली संधी गमावल्याची त्याला जाणीव झाली. 



 

काय झालं होतं सामन्याच्या शेवटी  - 

अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले.  दिनेश कार्तिकने खेळलेल्या आठ चेंडूने बांगलादेशचा घात केला असे म्हणायला हरकत नाही.  एकवेळ सुस्थितीत असणारा भारतीय संघ कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दडपणात आला होता. हातातील सामाना बांगलादेशच्या गोलंदाजांनी हिसकावून घेतल्याचे चित्र तयार झाले होते. नवखा विजय शंकर खेळताना चाचपडत होता तर मनिष पांडेलाही आपली चमक दाखवता येत नव्हती.  अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्या तीन षटकात भारताला 35 धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. यावेळी मुस्तफीझूर रहमानने टिच्चून मारा करत पहिले चार चेंडू निर्धाव टाकले, तर पाचव्या चेंडूवर विजयने लेगबायच्या जोरावर धाव घेतली. मात्र, अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेला मनिष पांडे (28) बाद झाल्याने बांगलादेश मजबूत स्थितीत आला. यावेळी, शंकरच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव नजीक दिसत होता. मात्र, खेळपट्टीवर आलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकने 19व्या षटकात सर्व चित्रंच पालटले. त्याने रुबेल हुसैनच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत एकूण 22 धावांची लयलूट केली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना शंकर पुन्हा एकदा चाचपडला, मात्र त्याने चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात शंकर झेलबाद झाला, परंतु तोपर्यंत स्ट्राइक चेंज झाल्याने कार्तिक फलंदाजीला आला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकत भारताचा थरारक विजय साकारला. रुबेलने दोन प्रमुख बळी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले, मात्र कार्तिकने त्याच्या एका षटकात संपूर्ण सामना फिरवला. कार्तिकने आपल्या शानदार खेळीत दोन चौकार व तान षटकार खेचले.   

ते निर्णायक षटक - 

  • अखेरच्या षटकात भारताला 12 धावांची गरज होती. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर  नवखा खेळाडू विजय शंकर स्ट्राईकवर होता. दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सौम्या सरकारने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे एक धाव भारताच्या खात्यात जमा झाली.
  • सौम्या सरकारने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे नवखा खेळाडू विजय शंकरवरील दबाव आणखी वाढला.  
  • दुसऱ्या चेंडूवर विजय शंकरने एक धाव घेतली आणि दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. दुसरी धाव घेण्यासाठी विजय शंकरने नकार दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक स्ट्राईकवर राहिला.
  • तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा विजय शंकर स्ट्राईकवर आला.
  • अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय शंकरने शानदार चौकार ठोकला आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
  • पाचव्या चेंडूवर विजय शंकर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.
  • सुदैवाने अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर दिनेश कार्तिकच होता आणि विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता होता. सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि मालिका भारताच्या खिशात टाकली.

Web Title: Shankara's 'Samadhi' .... After that 'Thaarak' Vijay, Vijay closed himself in the room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.