शमी, विजय शंकर यांना संधी मिळण्याची शक्यता

सुनील गावसकर लिहितात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:26 AM2019-06-13T06:26:56+5:302019-06-13T06:27:21+5:30

whatsapp join usJoin us
Shami and Vijay Shankar are likely to get an opportunity | शमी, विजय शंकर यांना संधी मिळण्याची शक्यता

शमी, विजय शंकर यांना संधी मिळण्याची शक्यता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडमध्ये पावसाने कहर केला. याचा फटका विश्वचषकात अनेक संघांच्या प्रगतीला बसला. काही संघांचे सामने रद्द झाल्याने गुणविभागणी झाली. अव्वल स्थान मिळवू शकणाऱ्या संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. द. आफ्रिकेचे खाते एका गुणामुळे उघडले. त्याचवेळी विंडीजची मात्र घोर निराशा झाली असावी.

भारत- न्यूझीलंड सामन्यावर देखील पावसाचे सावट कायम आहे. सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला सहज नमविले होते. पण मुख्य स्पर्धेत शानदार विजय नोंदविणारा भारत सध्या फॉर्ममध्ये आहे. शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे पुढील तीन
सामन्यात तो खेळणार नाही. चाहते यामुळे निराश झाले असावेत. पण निराश होण्याची गरज नाही. महिन्याअखेर इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात तो खेळेल अशी आशा करायला हरकत नाही. आयसीसी सामन्यात शिखरचा रेकॉर्ड अत्यंत चांगला असल्याने संघ व्यवस्थापही तो लवकर बरा व्हावा यासाठी झटत आहे.

धवनच्या दुखापतीमुळे चौथ्या स्थानावर कोण, याचा विचार सुरू झाला. हार्दिक पांड्या याने संधी मिळताच या स्थानाला न्याय दिला आहे. पुढील साामन्यात अशीच स्थिती राहिल्यास पांड्या पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर खेळताना दिसेल. भारताने झटपट गडी गमावल्यास मात्र विजय शंकरला संधी दिली जाऊ शकते. याआधी न्यूझीलंडमध्ये शंकरने उत्कृष्ट खेळ केला होता. तो गोलंदाजीतही उपयुक्त असल्याने त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे कुलदीपऐवजी शमीला स्थान मिळू शकते. हे बदल सामन्याची स्थिती आणि प्रतिस्पर्धी संघावर अवलंबून असतील. भारतीय संघ सध्या बलाढ्य कामगिरी करीत असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघ कोण हे महत्त्वाचे नाहीच. सामन्यादरम्यानचे हवामान हीच चिंता आहे. खराब हवामानाचा फटका बसल्यास विजयाची भूक असलेल्या भारताची लय बिघडण्याची भीती आहे.
 

Web Title: Shami and Vijay Shankar are likely to get an opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.