धोनीच्या समर्थनार्थ सेहवागची तुफान फटकेबाजी, वाचा काय म्हणाला

आपण हार्दिक पंड्या लवकर बाद झाला त्याकडे पाहत नाही. आपले सलामीवीर चांगले कामगिरी करू शकले नाही. आपण फक्त धोनीच्या चुकीकडे बोट दाखवतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 07:58 AM2017-11-07T07:58:22+5:302017-11-08T01:46:11+5:30

whatsapp join usJoin us
Sehwag fluttered in support of Dhoni, read what he said | धोनीच्या समर्थनार्थ सेहवागची तुफान फटकेबाजी, वाचा काय म्हणाला

धोनीच्या समर्थनार्थ सेहवागची तुफान फटकेबाजी, वाचा काय म्हणाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - माजी कर्णधार एम.एस धोनीला संघातील आपली भूमिका समजून घ्यावी लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याला सुरुवातीपासूनच वेगाने धावा काढाव्या लागतील. संघ व्यवस्थापनाला याविषयी त्याला सांगावे लागेल. त्याचप्रमाणे, टीम इंडियाला सध्या एमएस धोनीची गरजही आहे. तो योग्य वेळी निवृत्ती घेईल आणि कधीच कोणत्याही युवा खेळाडूचा रस्ता अडवणार नाही. असे मत भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग म्हणाला आहे. एकप्रकारे सेहवागनं धोनीच्या समर्थनार्थ बोलून टीकाकारचे त्यानं तोंडच बंद केलं आहे. 

धोनीच्या संघातील स्थानावरुन माजी खेळाडूंमध्ये मतमतांतरे असल्याचे पहायला मिळतेय. धोनीच्या संघातील जागेवरुन क्रिकेट विश्वात सध्या दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. काही माजी खेळाडू धोनीच्या समर्थनार्थ तर काहीजणांनी त्याने आता राजीनामा द्यावा असे मत मांडले आहे. सेहवागसह सुनिल गावसकरांनी दिला धोनीला पाठिंबा जोरदार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकरला त्यांची मते मांडायचे स्वातंत्र्य आणि हक्क आहे. ते भरपूर क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांच्या मतांमधून ते दिसते. आपण इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता वाट पाहायला हवी. जेव्हा कुणी वयाचा ३० चा टप्पा पार करते तेव्हा आपण सर्वजण त्या खेळाडूचा चुका शोधू लागतो. आपण तो खेळाडू किती लवकर निवृत्त होतो याचीच वाट पाहत असतो. 

आपण त्यावेळी ३० वयाच्या खालच्या खेळाडूंकडे पाहत नाही जे विशेष काही करत नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण त्याच सामन्यात चांगली कामगिरी न केलेल्या खेळाडूंकडे पाहत नाही. आपण हार्दिक पंड्या लवकर बाद झाला त्याकडे पाहत नाही. आपले सलामीवीर चांगले कामगिरी करू शकले नाही. आपण फक्त धोनीच्या चुकीकडे बोट दाखवतो. हे दुर्दैवी आहे. आणि असाच आपला देश आहे. असेही गावसकर पुढे म्हणाले.

माजी खेळाडूंनी केलं लक्ष - 
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं आहे. राजकोटमध्ये शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात धोनीला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यावरून माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि अजित आगरकरने धोनीला लक्ष्य करताना युवा खेळाडूंना संधी द्यावी, असं म्हटलं आहे. या सामन्यात ९.१ षटकांत ६७/४ अशी भारताची अवस्था असताना धोनी मैदानावर आला. त्या वेळी भारतीय संघाला विजयासाठी १२ च्या सरासरीने धावा करण्याची गरज असताना धावांची गती वाढवण्यात धोनी अपयशी ठरला. केवळ १६ धावांसाठी त्याला १८ चेंडू खेळावे लागले.
 

धोनीने टी-२० क्रिकेटबाबत फेरविचार करावा - लक्ष्मण 
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी ज्या वेळी मैदानात आला त्या वेळी कोहली त्याच्यासोबत खेळत होता. धोनीने विराट कोहलीला अधिक स्ट्राईक देणे गरजेचे होते. सध्या धोनी टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसतोय. तो मैदानात उतरल्यानंतर सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि त्यानंतर तो फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो. कोहली १६० च्या सरासरीने धावा करत असताना धोनीची सरासरी केवळ ८० होती. त्यामुळे मला असं वाटतंय, की धोनीने टी-२० क्रिकेटबद्दल फेरविचार करण्याची गरज आहे. टी-२० मध्ये त्याने युवा खेळाडूंना संधी द्यावी. टी-२० सामन्यात धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित आहे, असं लक्ष्मणने सुचवलं. त्याने फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला लक्ष्मणने दिला. 

धोनीला वगळलं तरी त्याची कमतरता भारतीय टीमला जाणवणार नाही-

इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना अजित आगरकर म्हणाला, पर्याय शोधण्याची वेळ आता आली आहे, कमीतकमी टी-20 त तरी ती वेळ आली आहे असं मला वाटतं. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता धोनीच्या प्रदर्शनावर शंका नाही असंही आगरकर म्हणाला. धोनीला मैदानावर जम बसवायला थोडा वेळ लागतो, पण टी-20 सामन्यात तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. तुम्हाला कमी वेळात खूप चांगलं प्रदर्शन करायचं असतं. त्यामुळे टी-20 त धोनीला पर्याय शोधण्याची आता योग्य वेळ आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातून धोनीला वगळलं तरी त्याची कमतरता भारतीय टीमला जाणवणार नाही कारण टी-20 साठी भारताकडे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत.  पर्याय शोधण्याची वेळ आता आली आहे.    

भारत-न्यूझीलंड आज निर्णायक लढत, पावसाची शक्यता  -
भारतीय संघ आज (मंगळवारी) न्यूझीलंडविरुद्ध तिस-या व निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मालिका विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी क्रमावर सर्वांची नजर राहणार आहे. दरम्यान, या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. मालिका १-१ ने बरोबरीत असून, यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेप्रमाणे या मालिकेच्याही अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडने पहिल्या वन-डे व त्यानंतर टी-२० मालिकेत चांगली टक्कर दिली आहे. या शहरात जवळजवळ तीन दशकानंतर (२९ वर्षे) आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन होत आहे. धोनीला सर्वात जलद क्रिकेट प्रकारात बदलण्याच्या मागणीला अधिक जोर धरल्यामुळेही ही लढत महत्त्वाची आहे. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला होता. पण दुस-या लढतीत संघाला ४० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

Web Title: Sehwag fluttered in support of Dhoni, read what he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.